Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रवंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर भाजपच्या वाटेवर?

वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर भाजपच्या वाटेवर?

gopichand padalkar, vanchit bahujan aghadi, BJP, Prakash Ambedkarसांगली : वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर धक्के बसायला लागले आहेत. प्रकाश आंबेडकरांचे विश्वासू लक्ष्मण माने यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता वंचितचे सचिव गोपीचंद पडळकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सांगलीतील खानापूर किंवा जत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत.

वंचितमध्ये संघाची घूसखोरी असल्याचा खळबळजनक आरोप करून लक्ष्मण माने यांनी वंचितमधून फारकत घेतली होती. त्यानंतर वंचितचा मित्रपक्ष एमआयएमनेही प्रकाश आंबेडकरांना संघाची फूस असल्याचा खळबळजनक आरोप करून फारकत घेतली आहे. आता पूर्वाश्रमीचे भाजपाचे वंचितचे महत्वाचे पदाधिकारी गोपीचंद पडळकर यांच्या हालचालीमुळे वंचितची चिंता वाढली आहे.

भाजप आणि शिवसेना युतीच्या निर्णयानंतर पडळकर यांच्या भाजपप्रवेशाबाबत निर्णय होणार आहे. पडळकर लोकसभा निवडणुकीतही सांगली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी खानापूर आणि जत मतदारसंघात पडळकर यांना जास्त मतदान झालं होतं. त्यामुळे पडळकरांच्या विधानसभेसाठी आशा पल्लवीत झाल्या आहेत.

भाजपाचा गड असणाऱ्या जतमध्ये सध्या विद्यमान आमदार विलासराव जगताप यांना स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध आहे.येथील धनगर समाजाची संख्या अधिक असल्यामुळे पडळकर यांना भाजपात घेऊन तिकीट देण्याचा भाजपा नेत्यांचा विचार आहे. तर खानापूरमध्ये पडळकर यांची मतं निर्णायक ठरणार आहेत. सध्या या मतदारसंघात शिवसेनेचे अनिल बाबर आमदार आहेत. या सर्वप्रकारामुळे वंचितच्या समस्या वाढत चालल्या आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments