Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रसांगलीओल्या झालेल्या औषधी साठ्याची विक्री करू नका - सहायक आयुक्त (औषधे)...

ओल्या झालेल्या औषधी साठ्याची विक्री करू नका – सहायक आयुक्त (औषधे) ध. अ. जाधव

Medicines on Road,medicines,drug,medicalसांगली: सांगली जिल्ह्यात महापूरामुळे घाऊक, किरकोळ औषध विक्रेत्यांच्या दुकानात पुराचे पाणी गेल्यामुळे औषधी साठा ओला झाला आहे. ओला झालेला औषधी साठा उन्हामध्ये सुकवून वापर / वितरणाची शक्यता नाकारता येत नाही. अशी औषधे वापरणे योग्य नसल्याने व्यापक जनआरोग्याच्या दृष्टीने त्यांची विक्री व वितरण करू नये. अशी औषधे वापरल्यानंतर जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सहायक आयुक्त (औषधे) ध. अ. जाधव यांनी केले आहे.

भिजलेला औषध साठा रस्त्यावर व इतरत्र टाकू नये. ज्या औषध दुकानातील औषधी साठा भिजलेला आहे त्यांनी त्यांच्या साठ्याबाबतच्या विमा परतावा बाबतची पुर्तता केल्यावर सदरचा साठा वितरकामार्फत उत्पादकास परत पाठवावा अथवा त्याची योग्यप्रमाणे विल्हेवाट लावावी. काही अडचण असल्यास अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. जाधव यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments