अभिजीत बिचुकलेंची होमगार्डला शिवीगाळ

- Advertisement -

abhijit bichukale home gaurd
सातारा : होमगार्डने काठी आडवी लावल्यामुळे ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत बिचुकले यांनी शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून बिचकुले यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणारे अभिजीत बिचुकले चर्चेत आले आहेत. बिचुकले शिर्के शाळा मतदान केंद्रावर अभिजीत बिचुकले सहकुटुंब मतदान करण्यासाठी आले होते. यावेळी होमगार्डने काठी आडवी लावल्यामुळे बिचुकलेंचा वाद झाला. त्यावेळी बिचुकलेंनी होमगार्डला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संबंधित होमगार्डने सातारा शहर पोलिस ठाण्यात बिचुकलेंविरोधात तक्रार दिली होती.

सातारा शहर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी बिचुकलेंवर गुन्हा दाखल केला आहे. जावळी विधानसभा आणि वरळी विधानसभा या दोन ठिकाणी अभिजीत बिचुकले हे अपक्ष उमेदवारी लढवत आहेत. अभिजीत बिचुकले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सर्व राजकीय षडयंत्र आहे. तक्रारदार होमगार्डचीच मी तक्रार दाखल करणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here