Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रअखेर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर; उदयनराजेंची डोकेदुखी वाढली!

अखेर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर; उदयनराजेंची डोकेदुखी वाढली!

Udayan Rajen, NCP, Sataraसातारा : अठरा राज्यातील 64 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. मात्र साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीता त्यामध्ये समावेश नव्हता. विरोधकांनी याचा जाब विचारल्यानंतर अखेर सातारा लोकसभेची तारीख जाहीर करण्यात आली. विधानसभा निवडणुकीसोबतच 21 ऑक्टोबरला सातारा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचं मतदान होणार आहे. विधानसभेसोबतच 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. यामुळे राष्ट्रवादीतून भाजपावासी झालेल्या उदयनराजे भोसलेंची डोकेदुखी वाढली आहे.

साताऱ्यातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर मिळवलेल्या खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे भोसले यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या घोषणेच्या वेळी साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक जाहीर होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने सातारा वगळता इतर लोकसभा पोटनिवडणुकांची घोषणा केल्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे साताऱ्याच्या जागेसाठी उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशीच लढत होणार असल्याचं मानलं जात आहे. सुरुवातीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस पोटनिवडणुकीत उतरवणार असल्याची चर्चा होती.

राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राचा विचार केला, तर पहिल्यापासून सातारा जिल्ह्याची ओळख राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी राहिली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच या जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड राहिली. गेल्या 2 टर्म छत्रपती उदयनराजे भोसले हेच राष्ट्रवादीकडून खासदार म्हणून निवडून येत आहेत. यंदाही त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवला. मात्र तीनच महिन्यात त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.

उदयनराजेंनी मारली होती बाजी…..

मे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उदयनराजे भोसलेंनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव केला होता. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 मतं, तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार498 मतं मिळाली. उदयनराजे भोसले यांनी मागील 2014 च्या निवडणुकीत जवळपास साडेतीन लाख मतांनी विजय मिळवला होता. मात्र यंदा त्यांची आघाडी निम्म्याने घटली. 2014 मध्ये उदयनराजे भोसले 3 लाख 66 हजार 594 मतांनी विजयी झाले होते. यंदा उदयनराजेंना इतकं लीड घेता आलं नाही. 2019 च्या निवडणुकीत राजेंना 1,26,528 मतांनी विजय मिळवता आलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments