Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रसातारासातारा सैनिक शाळेतील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध 5 जानेवारी 2020 रोजी होणार...

सातारा सैनिक शाळेतील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध 5 जानेवारी 2020 रोजी होणार प्रवेश परीक्षा

मुंबई : सैनिक शाळा सातारा येथील सन 2020-21 च्या सत्रातील ६ वी आणि ९ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रवेशासाठी ठराविक नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज 5 ऑगस्ट 2019 ते 23 सप्टेंबर 2019 या कालावधीत ऑनलाईन भरायचे आहेत. या प्रवेशांसाठी 5जानेवारी 2020 रोजी प्रवेश परिक्षा होणार आहे. सैनिक शाळा सातारा संरक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त अधिपत्याखाली १९६१साली स्थापन झाली आहे.

ऑनलाईन अर्ज भण्यासाठी www.sainiksatara.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज भरताना आवश्यक त्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट आपल्यासोबत ठेवावा. ऑनलाईनवर पूर्णपणे भरलेल्या प्रवेश अर्जाची प्रिन्टेड प्रत व डिमांड ड्राफ्ट आणि सोबतची जोडपत्रे सैनिक शाळा साताराच्या कार्यालयात पोहोचवण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2019 रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असेल. इयत्ता सहावीतील प्रवेशासाठी उमेदवार 1 एप्रिल 2008 ते 31 जुलै 2010 (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान जन्मलेला असावा. इयत्ता नववीतील प्रवेशासाठी उमेदवार 1 एप्रिल 2005 ते 31 मार्च 2007 (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान जन्मलेला असावा व सध्या मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत असावा. इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी प्रश्नपत्रिका फक्त इंग्रजीमधून असतील. इयत्ता सहावीसाठी 60 जागांसाठी प्रवेश दिला जाईल, तर नववीतील प्रवेशासाठी 7 जागा उपलब्ध असणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments