Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रसाताराउदयनराजे भोसलेंची कॉलर खाली, श्रीनिवास पाटलांच्या मिशा ताईट!

उदयनराजे भोसलेंची कॉलर खाली, श्रीनिवास पाटलांच्या मिशा ताईट!

Shriniwas Patil udayanraje bhosale satara
साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन वभाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या पराभवासाठी सर्वशक्ती पणाला लावली होती. उदयनराजे भोसले पिछाडीवर चालत असून त्यांची कॉलर खाली दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांची विजयाकडे घौडदौड सुरु आहे.

साता-यात भाजपाचे लोकसभेचे उदनयराजे भोसले विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. उदनयराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. तरी सुध्दा ३२ हजार मतांनी उदनयराजे भोसले पिछाडीवर चालत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पावसामध्ये श्रीनिवास पाटील यांच्यासाठी सभा घेतली होती. उदनराजेंच्या पक्ष बदलण्याच्या भूमिकेमुळे मतदारांमध्ये नाराजी होती हे सध्यातरी स्पष्ट होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments