Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रतर मी निवडणुकीतून माघार घेईल - उदयनराजे भोसले

तर मी निवडणुकीतून माघार घेईल – उदयनराजे भोसले

Udayan Rajen, NCP, Sataraसातारा : साता-यात राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपाचा झेंडा हाती घेतलेले उदयनराजे भोसलेंनी लोकसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. शरद पवार मला वडिलांच्या स्थानी आहेत. लोकसभा निवडणुकीला जर शरद पवार उभे राहिले तर मी उभा राहणार नाही. यामुऴे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

उदयनराचे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला परंतु त्यांच्या मनात पवारांबद्दल जे प्रेम आहे त्यांनी ते व्यक्त केले. व पवारांबद्दल भावूक झाल्याचे दिसून आले. उदयनराजे म्हणाले की, मी सांगतो ना… ते आदरणीय काल पण होते, आज पण आहेत आणि भविष्यातही असतील. ते जर उभे राहिले, तर मी फॉर्म भरणार नाही. फक्त एकच त्यांनी करावं, दिल्लीतला बंगला आहे ना, गाडी आहे, तेवढी मुभा आपल्याला द्यावी”, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्यातील लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. 21 ऑक्टोबरला सातारा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचं मतदान होणार असून विधानसभेसोबतच म्हणजेच 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.

राष्ट्रवादी तर्फे अद्यापही कुणाला उमेदवारी मिळणार याचे पत्ते ओपन केले नाहीत. तरी सुध्दा सत्ताधा-यांना साता-यात धडकी भरली असल्याचे दिसून येत आहे. पवारांनी दोन दिवसापूर्वी जो मेळावा घेतला त्या प्रचंड असा प्रतिसाद मिळाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments