Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रसाताराआम्ही काय मेलेल्या आईचे दूध पेलेलो नाही, राजमातांनी शिवेंद्रराजेंना फटकारले

आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पेलेलो नाही, राजमातांनी शिवेंद्रराजेंना फटकारले

rajmataशरद पवार साहेबांनी व त्यांच्या पक्षाने ५० वर्षांहन अधिक काळ तुमच्या वडिलांना नेतृत्वाची संधी दिली. त्या शरद पवारांना उतारवयात फसवून तुम्हा गद्दारी केली आहे. गद्दारीचा हा इतिहास तुम्हाला नवा नाही आणि तरीही तुम्ही काट्याने काटा काढायची भाषा करता? काट्याने काटा काढायला आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पेलेलो नाही. येणाऱ्या निवडणुकीत कुणाचा काटा निघणार आहे हे जनतेने ठरवले आहे. पुन्हा बोलाल तर अजून बरेच माझ्याकडे शिल्लक आहे हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्रसिध्दी पत्रकातून जबरदस्त फटकारले.
काय म्हंटले आहे प्रसिद्धी पत्रकात ?
जरा इतिहास तपासून घ्या, जुन्या गोष्टी आठवा. तुम्हाला व तुमच्या वडिलांना जे काही मिळाल ते आमच्यामुळं! हे तुम्ही एवढा लवकर विसरता. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज हे मोठ्या अंतःकरणाचे होते. आपल्या भावाचं राजकारण उभं करावं हा हेतू प्रामाणिक होता. म्हणूनच १९६०च्या दशकात त्यांनी साखर कारखान्याचं प्रपोजल तयार केलं होते. त्यासाठी जिहेची जागा आमच्यासाठी व शेंद्रे तुमच्यासाठी हे प्रतापसिंह महाराजांनी सुचवले होते. पण कारखाना नंतर तुमच्या वडिलांनी एकट्याने गिळंकृत केला. १९७८ ला तुमचे वडील अभयसिंहराजे यांना राजकारणात श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी आणले. त्यासाठी स्वत:च्या खर्चाने तुमच्या वडिलांची निवडणूक केली. त्यावेळी बाबुराव घोरपडे ही सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील मोठी आसामी होती. निवडणुकीच्या काळात स्वत:च्या गाडीवर तुमच्या वडिलांनी दगडफेक घडवून आणली. सिव्हील हॉस्पिटलमध्ये हाताला, तोंडाला, डोक्यावर बँडेज बांधून त्यावर मयुरी क्रोम ओतून तुमच्या वडिलांनी प्रचारात सहानुभुती मिळवली आणि केवळ ५ हजारांनी तुमचे वडील निवडून आले.
प्रतापसिंह महाराज नसते तर घोरपडे मास्तर पडणे मुश्किल होते. त्यानंतर आमच्या दुर्दैवाने श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे निधन झाले आणि त्याचाच फायदा तुमच्या वडिलांनी घेतल्या. १९८० च्या पोटनिवडणकीत उदयनराजे तर बच्चा होते. लहानपणी वडिलांचे छत्र गेल्याने त्यांना स्ट्रेस अल्सर झाला होता. ते प्रचंड आजारी असताना पण तुमच्या वडिलांना निवडणुकीचे पडले होते. आजारी असताना शाळेच्या ड्रेसमधून तुमच्या मामांनी म्हणजे बंटीराजांनी उदयनराजेंना प्रचारात आणले. शाळेच्या डेसवर ओळखले जाणार नाही म्हणून दरबारी ड्रेस व पगडी घालून त्यांना प्रचारात तुमच्या वडिलांनी फिरवले.

त्यावेळचे डॉ. माधवराव आगाशे हे संतापाने मला म्हणाले, की तुम्ही मुलाच्या जीवाशी का खेळ खेळता? मीही अभयसिंहराजेंना सांगितले होते. उदयनराजे आजारी आहेत त्यांना फिरवू नका. मात्र,तुमच्या वडिलांना उदयनराजेंच्या जीवाची काळजी नव्हती. प्रत्येक निवडणुकीत तुमचे वडील हेच सहानुभुतीचे राजकारण खेळत आले, असा आरोप त्यांनी केला.
१९९६ ला तुमच्या वडिलांनी सतीश जाधव यांना उदयनराजेंकडे पाठवले. मला आमदारकीला मदत करा मी तुम्हाला खासदारकीला मदत करतो असा शब्द अभयसिंहराजन दिला. मात्र, तो न पाळता अभयसिंहराजेंनी आमदारकीला उदयनराजेंचा उपयोग करुन घेतला आणि खासदारकीला त्यांना फसवले. त्यामुळेच सतीश जाधव तुम्हाला तुटले. अभयसिंहराजेंनी उदयनराजेंना अनेकदा फसवले. तीच परंपरा तुम्ही चालवत आहात, असा टोला देखील त्यांनी लगावला.

१९९९ ला तुमच्या वडिलांनी माझ्या मुलावर म्हणजे उदयनराजेंवर खोटा आळ घेतला. त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीच्या दिवशी बुथ उधळले. मतदान होवू दिले नाही. दहशत निर्माण केली. खोटी सहानुभूती निर्माण करुन तुम्ही निवडणूक जिंकली. माझ्या मुलाला मात्र कोर्टकचेऱ्या करायला लावल्या. उदयनराजेंना फाशी होणार म्हणून तुम्ही व तुमच्या वडिलांनी फाशीचा वड सजवला होता. हे आम्ही कसे विसरु? पतंगराव कदम सहकारमंत्री असताना अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्यात येत होता त्यावेळी तुम्हाला उदयनराजेंना दादा म्हणावे वाटले. तुम्ही त्यांना रात्रीच्यावेळी भावनिक केले आणि प्रशासक आणण्याची प्रक्रिया थांबवून घेतली. पतंगराव उदयनराजेंना म्हणाले होते राजे. तुम्ही चूक करत आहात. राजकारण असे करायचे नसते. पतंगरावांचे तेव्हाच उदयनराजेंनी ऐकायला हवे होते. आज अजिंक्यतारा कारखान्याची काय अवस्था आहे. घोटाळे करुन तुम्ही कारखाना खावून टाकला आहे. बँका तुम्हाला चालवता आल्या नाहीत. खाबुगिरीने बँका दुसरीकडे विलीन करायला लागल्या. शरद पवारांना अनेकदा फसवले तुम्ही ही त्याच मार्गाने गेला आणि पक्षाला दोष कशाला देता, असा सवाल त्यांनी विचारला.

प्रतापसिंह महाराजांच्या जीवावर अभयसिंहराजेंनी राजकारण केले आणि उदयनराजेंच्या जीवावर तुम्ही राजकारण करत आहात. सातारा पालिकेला प्रतापसिंह महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय उदयनराजे यांनी घेतला तर तुम्ही उदयनराजेंनी बांधलेल्या व्यापारी संकुलाला अभयसिंहराजेंचे नाव देण्याचा हट्ट धरला. दुसऱ्याने केलेल्या आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा तुमचा हा धदा नवीन नाही. तुम्ही केलेली पापे झाकण्यासाठीच तुम्ही मनोमीलनाचे नाटक उभे केले होते. त्यात भोळ्या उदयनराजेंचा बळी गेला.
नगरपालिकेच्या निवडणकीत तमच्या पत्नीचा झालेला पराभव आजहा तुम्हाला झोंबतो. मग तुम्ही १९९९ साल कसे विसरता? आणि आम्हाला कसे विसरायला लावता? राजवाड्याच्या बाहेर काय तुम्हाला विचारुन पडायचे का? सातारा जिल्ह्याच्या सामाजिक वाटचालीत मी नेहमीच लोकांबरोबर राहिले आहे. शरद पवार यांच्यासह मोठ्या राजकीय नेत्यांना मी यापूर्वीही अनेकदा भेटले आहे. राजघराण्याची भाषा करता आणि वडीलधाऱ्यांच्या संदर्भाने कसे बोलावे याचे तारतम्य तुम्हाला नाही का? याद राखा पुन्हा असे काही बोलाल तर ?उदयनराजेंचे बंधूप्रेम तुम्हाला तुमची निवडणूक आली की आठवले. १९९९ ला बंधू नाही तुम्हाला बंदुक आठवत होती आणि आता तर काट्याने काटा काढायची भाषा करता. येणाऱ्या निवडणुकीत कुणाचा काटा निघणार आहे हे जनतेने ठरवले आहे. पुन्हा बोलाल तर अजून बरेच माझ्याकडे शिल्लक आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा राजमाता कल्पनाराजे यांनी शेवटी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments