Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रसोलापूरसोलापूरमध्ये एमआयएमच्या खेळीने भाजपचा महापौर

सोलापूरमध्ये एमआयएमच्या खेळीने भाजपचा महापौर

Shrikanchna Yannam,Solapur mayorसोलापूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीने प्रयत्न केला होता. परंतु, एमआयएमने त्यांना साथ न दिल्यामुळे भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी विजयी झाल्या. श्रीकांचना यन्नम यांना 51 मते तर एमआयएमच्या शहेजादीबानो शेख यांना 8 मते मिळाली. महाविकास आघाडीचा प्रयत्न फसला.

सोलापूरमध्ये महाराष्ट्र विकास आघाडी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, बसपा महापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएमला सोबत घेऊन महापौरपदावर बसवण्याच्या तयारीत होते. परंतु एमआयएम सोबत नसल्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीकडे 43 संख्याबळ होते. एमआयएमने साथ दिली असती तर एमआयएमचे 9 नगरसेवक मिळून आघाडीचा आकडा 52 पर्यंत गेला असता. परंतु एमआयएमने त्यांचा स्वतंत्र उमेदवार दिला होता. त्यामुळे भाजपकडे 49 मते असतांना सुध्दा त्याच्या महापौरांना 51 मते मिळाली. त्यामुळे या संभाव्य आघाडीचा प्रयोग फसला आणि भाजपचा विजय सोपा झाला.

महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा, माकप या पक्षांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तिथेच भाजपचा विजय निश्चित झाला होता. मात्र एमआयएमने आपला उमेदवार रिंगणात उतरवल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. अखेर भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांनी 51 मते घेत एमएमयाएमच्या उमेदवाराचा दारूण पराभव केला.

दरम्यान, निवडणुकीच्या आधी भाजपविरुद्ध शिवसेनेला संख्याबळ जमवण्यात अपयश आलं. एवढेच नव्हे तर महापौरपदाच्या निवडणुकीत बसपा आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाने भाजपला दिला आहे.

एकूण : 102 जागा

पक्षीयबलाबल…

भाजप – 49
शिवसेना – 21
कॉंग्रेस – 14
राष्ट्रवादी – 4
एमआयएम – 9
बसपा – 4
माकप – 1

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments