Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रपंढरपूरच्या विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात आता मोबाईल बंदी

पंढरपूरच्या विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात आता मोबाईल बंदी

vitthal-rukmini-templeमुंबई : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोबाईल बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जानेवारीपासून मंदिरात मोबाईल घेऊन जाता येणार नाही. हा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

मंदिरामध्ये व्हीपाआयपी मंडळी आल्यानंतर फोटोसाठी सर्वजण मोबाईलमध्ये फोटो काढतात. शुटींग घेतात. त्यामुळे इतर भक्तांना दर्शन घेतांना त्रास होतो, वेळ वाया जातो. यामुळे मंदिरात मोबाईल बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी जातांना भक्तांना गेटमध्येच मोबाईल जमा करावा लागणार आहे. परंतु या निर्णयामुळे मंदिर समितीची अडचण होण्याची चिन्हे आहेत.

मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात त्यामुळे साहजिकच मोबाईलची संख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यामुळे त्याची नोंद घेणे, परत दर्शनानंतर त्याच भाविकाला त्याचाचं मोबाईल परत देणे यामध्ये बराच वेळ जाईल. म्हणून या निर्णयाची अंमलबजावणी करताना थोडा त्रासदायक ठरणार असल्याची चर्चा भक्तांमध्ये सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments