Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रशिवसेनेच्या रश्मी बागल यांना, युतीच्या दोन माजी आमदारांकडून धक्का

शिवसेनेच्या रश्मी बागल यांना, युतीच्या दोन माजी आमदारांकडून धक्का

Rashmi Bagalसोलापूर : करमाळयातील शिवसेना उमेदवार रश्मी बागल यांना मोठा धक्का बसला आहे. भाजप  माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तर तिकीट कापल्यामुळे शिवसेनेने विद्यमान आमदार नारायण पाटील यांनीही बंडखोरी केल्यामुळे दुहेरी आव्हान बागल यांच्यासमोर निर्माण झाले आहे. यामुळे येथील लढत चुरशीची होणार आहे.

रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीला रामराम करुन सेनेत प्रवेश केला. सेनेकडून त्यांना सोलापूर जिल्ह्यातून उमेदवारीही मिळाली. मात्र सेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी सेनेला सोडचिठ्ठी देत अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. तर भाजपचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी युती धर्म न पाळता आपला पाठिंबा अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना दिला. तर राष्ट्रवादीकडून संजय पाटील घाटनेकर हे मैदानात उतरलेले आहेत. त्यामुळे करमाळ्यातून फाईट चांगलीच रंगतदार होणार आहे.

करमाळ्यात शिवसेनेकडून रश्मी बागलराष्ट्रवादीकडून संजय पाटील घाटनेकर यांच्यात थेट लढत होत आहे. तर नारायण पाटील आणि संजय शिंदे हे दोन्ही तगडे उमेदवार अपक्ष रिंगणात आहेत. यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी आमदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष अर्ज भरला आहे. यामुळे जुने शिवसैनिक हे शिवसेनच्या रश्मी बागल यांच्या विरोधात काम करण्याची शक्यता आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments