Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रसोलापूरस्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारिणी 'या कारणामुळे' बरखास्त

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारिणी ‘या कारणामुळे’ बरखास्त

mp raju shetty on shiv sena ncp congress over maharashtra govt formationस्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गाव ते राज्यपातळीपर्तंची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सोलापूरात झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत ही घोषणा केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज झाली. या बैठकीच्या पहिल्या सत्रात सविस्तर चर्चा होऊन संघटनेची पुर्नबांधणी, अनेक पदाधिकाऱ्यांना बढती देणं किंवा नव्यानं संघटनेत प्रवेश केलेल्यांना संधी देणे इत्यादींसाठी आहे ती कार्यकारिणी बरखास्त करून, महिनाभराच्या अगोदर नव्या निवडी जिल्हापातळीवर करायच्या व त्यानंतर पुढील महिनाभरात प्रदेशपातळवरील निवडी करायच्या आहेत. अशा प्रकारचा संघटना पुर्नबांधणीचा दोन महिन्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्याची शेट्टी यांनी माहिती दिली आहे.

विभागीय व राज्य पातळीवर शिस्तपालन समिती कार्यरत होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. संघटनेची पुर्नबांधणी, अनेक पदाधिकाऱ्यांना बढती देणं किंवा नव्यानं संघटनेत प्रवेश केलेल्यांना संधी देण्यासाठी कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेण्यात आल्याचे शेट्टी यांनी सांगितले आहे.

फेब्रुवारीपर्यंत प्रदेश पातळीचे गठन…

आगामी ११ जानेवारीपर्यंत जिल्हा पातळीपर्यंतची संघटनेची बांधणी पूर्ण करायची, त्यानंतर ११ जानेवारी ते ११ फेब्रवारी या महिनाभराच्या कालावधीत प्रदेश पातळवरील बांधणी होईल. यानंतर राज्य कार्यकारिणीची पुन्हा बैठक घेऊन यांची निश्चिती होणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments