Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रसोलापूरतुमच्या ईडीला येडी केल्याशिवाय गप्प बसणार नाही; पवारांनी ठणकावले

तुमच्या ईडीला येडी केल्याशिवाय गप्प बसणार नाही; पवारांनी ठणकावले

sharad pawar on cm devendra ncp bjpपंढरपूर : आज ज्यांच्या हाती सत्ता आहे ते सत्तेचा गैरवापर करताना दिसतात. त्यांच्या विरोधात कोणी बोलले तर तो देशद्रोही ठरवला जातो. हे गुन्हेगारांवर कारवाई न करता त्यांच्याविरोधात जे बोलतात त्यांच्यावरच ईडीचं हत्यार वापरतात. आता तुमची ईडी असो वा काही असो तिला येडी केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सत्ताधा-यांना ठणकावले.
पंढरपूर येथे भारत भालके यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या कामकाजावर सडकून टीका केली. विरोधकांना चौकशीचा ससेमिरा मागे लावण्याची भीती दाखवत सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करीत आहेत. मात्र, आता बस्स झालं. तुमची ईडी असो किंवा काही असो तिला येडी केल्याशिवाय गप्प बसणार नाही. पवारांनी सत्ताधा-यांना दमदेताच कार्यकर्त्यांन मोदी, शहा मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.
शरद पवार, अजित पवार, आणि आता प्रफुल्ल पटेलांना ईडीने नोटीस पाठविल्यामुळे पवार संतप्त झाले आहेत. पवारांना बँक प्रकरणात गोवल्या जात असल्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments