Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रट्वीटरवर एंट्री करताच, भुजबळांनी मानले जनतेचे अभार

ट्वीटरवर एंट्री करताच, भुजबळांनी मानले जनतेचे अभार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि छगन भुजबळ यांनी ट्विटरवर एंट्री केली आहे. पहिलंवहिलं ट्वीट करत त्यांनी कार्यकर्त्यांशी आपण लवकरच संवाद साधणार असल्याचं म्हटलं आहे. ”माझ्या बांधवांनो आणि माता भगिनींनो, माझ्यावर विश्वास व्यक्त करून आपण मला नेहमीच साथ दिली, त्यामुळे मी आपला आभारी आहे, देशाच्या कानाकोपऱ्यातून आपण मला भेटण्यासाठी उत्सुक आहात,याची मला कल्पना आहे.माझ्यावरील वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर मी आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधायला येणार आहे,” असं ट्वीट भुजबळांनी केलं आहे. @ChhaganCBhujbal या नावाने भुजबळांचं ट्विटर हँडल आहे. ट्विटरवर त्यांनी आतापर्यंत कुणालाही फॉलो केलेलं नाही.

पुण्यात 10 जूनला भाषण

पुण्यात 10 जून रोजी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप होणार आहे. या समारोपाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ हे जाहीर भाषण करणार आहेत.

छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक आहेत. काही कार्यकर्त्यांनी केईएम हॉस्पिटलमध्ये जाऊन भुजबळांची भेट घेतली. मात्र सर्वसमान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी भुजबळ समोर कधी येतील, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र आता हल्लाबोल यात्रेच्या समारोपाच्या सभेतच भुजबळ भाषण करतील, हे निश्चित झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते म्हणून छगन भुजबळ यांना ओळखले जाते. भुजबळ यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची धुराही सांभाळली आहे. भुजबळ गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात होते, त्यामुळे भुजबळांसारखा धडाडीचा नेता पक्षापासून काही काळ दूर होता. आता जामीन मिळाल्याने भुजबळ पुन्हा राजकीय मैदानात उतरणार आहेत. मात्र त्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments