Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेनेचे आमदार फोडले तर आम्ही डोकं फोडू : अब्दुल सत्तार

शिवसेनेचे आमदार फोडले तर आम्ही डोकं फोडू : अब्दुल सत्तार

Will break the heads, legs of those who will try to split Shiv Sena Abdul Sattar
मुंबई : भाजपने कर्नाटक,गोवा व काही राज्यांमध्ये इतर पक्षाचे आमदार फोडून सत्तास्थापन केली होती. महाराष्ट्रात शिवसेनेला तशी भिती होती. त्यामुळे सर्व आमदारांना एकत्र ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या आमदारांना फोडणाऱ्यांना कडक इशारा देताना वादग्रस्त विधान केले आहे. शिवसेनेच्या आमदारांना फोडणाऱ्यांचे आम्ही डोकं फोडू असे विधान त्यांनी केले आहे.

सत्तार म्हणाले, जर कोणी शिवसेनेच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांचं डोकं फोडू त्याचबरोबर त्याचे पायही तोडून टाकू. यानंतर त्याची दवाखान्याची व्यवस्था आणि रुग्णावाहिका देखील शिवसेनाच उपलब्ध करुन देईल.
ही जी फोडाफोडीच्या राजकारणाची सध्या चर्चा सुरु आहे ती घटनेविरोधी आहे. ज्या पक्षाचे आमदार निवडून आले आहेत त्यांचेच राज्यात सरकार बनेल. त्यामुळे लोकांमध्ये जे नवनव्या पुड्या सोडण्याचे काम काही भाजपाचे नेते करीत आहेत, त्यांच्यासाठी हा इशारा आहे. यामुळे भाजपा याला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments