Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ खडसे भाजपला रामराम ठोकणार?

एकनाथ खडसे भाजपला रामराम ठोकणार?

eknath khadse criticizes bjp devendra fadnavis after exiting powerमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसेंची भाजपात फरफट होत असल्यामुळे खडसे भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. भाजपात नाराजांची खदखद चांगलीच वाढली आहे. पक्षातील नाराजांची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरु आहेत. खडसे पक्षसोडण्याच्या तयारीत असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन जळगावात कार्यकर्त्यांच्या बैठका सुरु केल्या आहेत.

एकनाथ खडसेंना भोसरी जमीन प्रकरणी अडकवून भाजपच्या मंडळींना खडसेंचा गेम केला. खडसेंनी वारंवार पक्षाच्या विरोधातील नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. खडसेंना विधानसभेत तिकीट न देता त्यांची मुलगी रोहिणी खडसेंना तिकीट देऊन भाजपच्या मंडळींनी पराभव केला. यामुळेही खडसे पक्षावर नाराज आहेत. पक्षविरोधी कारवाया करणा-या नेत्यांची तक्रारही खडसेंनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. परंतु त्यावर अद्यापही कोणतीही कारवाई झाली नाही.

खडसे भाजपातून बाहेर पडल्यास उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांत फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाकडून चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. पण खडसे आणि महाजन यांच्या कार्यकर्त्यांमधील आरोप प्रत्यारोपांमुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपाच्या बैठका पोलिस संरक्षणात होत आहेत.

खडसेंनी मुलगी रोहिणी खडसेंच्या पराभवामुळे पक्षावर निशाना साधला आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पक्षातील नेत्यांनीच पाडलं, असा आरोप केला होता. खडसेंच्या या आरोपाला उत्तर देताना, महाजन यांनी भाजपामधील पाडापाडी करणाऱ्या नेत्यांची नावं जाहीर कराच, असं आव्हानं दिलं होतं. त्यामुळे खडसे विरुध्द महाजन असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

तावडे आणि खडसे दोघेही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत. तावडे यांनी त्याबाबत जाहीर भाष्य टाळले असले तरी खडसे यांनी मात्र अनेक वेळा असंतोषाला वाट करून दिली आहे. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पाडून ओबीसी नेतृत्वाला मागे खेचण्याचा प्रयत्न होत असून नाराज आपोआप एकत्र येतात, असा आक्रमक सूर खडसे यांनी लावला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असलेले भाजपमधील नेते एकत्र येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपला काही दिवसांत फटका बसण्याची चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments