Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रगुजरातमध्ये भाजपसोबत जाणार नाही- शरद पवार

गुजरातमध्ये भाजपसोबत जाणार नाही- शरद पवार

मुंबई: गुजरात विधानसभा निवडणुकीत आम्ही गेलो तर काँग्रेससोबतच जाऊ, भाजपसोबत आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दात शरद पवारांनी भाजपसोबत आघाडी करण्याची शक्यता फेटाळून लावलीय. ते मुंबईत बोलत होते.

गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीची आणि स्थानिक काँग्रेस नेत्यांशी चर्चाही सुरू असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय. अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या गुजरातमध्ये एका आमदारांना प्रफुल्ल पटेल यांच्या सांगण्यावरून भाजपचे उमेदवार अमित शहा यांना जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण आज स्वतः शरद पवारांनीच हे वृत्तं फेटाळून लावलंय.

समृद्धी महामार्ग आणि कर्जमाफीच्या मुद्यावरून महाराष्ट्रातील भाजप सरकारवरही शरद पवारांनी कठोर शब्दात टीका केलीय, समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून अमानुषपणे जमिनी हिसकावून घेतल्या जात असल्याची टीका शरद पवारांनी केलीये. शेतक-यांच्या आत्महत्यांबाबत हे सरकार गंभीर नाही. आमच्या काळात आम्ही ७० हजार कोटी रूपयांची मदत शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केली होती. आता हे सरकार शेतक-यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्यानं आत्महत्या वाढत आहेत असंही पवार म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments