Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रनाशिकढगाळ हवामानाने द्राक्ष संकटात!

ढगाळ हवामानाने द्राक्ष संकटात!

नाशिक : अचानक ढगाळ हवामान पसरून काही भागात हलकशा स्वरूपात पावसाच्या सरी झाल्याने द्राक्ष बागांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. जिल्ह्यात दीड लाख एकरावरील द्राक्ष बागा त्यामुळे संकटात सापडल्या आहेत. मात्र मंगळवारी स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने वातावरण साफ होण्यास मदत झाली.

जिल्हयात सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच द्राक्षबागा संकटात सापडल्या होत्या. त्यात ऑक्टोबर नंतर नोव्हेंबरमध्ये हवामान स्वच्छ असल्याने द्राक्षांना फुलोरा व काही ठिकाणी मणींची अवस्था आल्यानंतर सोमवारी अचानक ढगाळ हवामान होवून पावसाच्या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी, नाशिक, निफाड व इगतपुरी तालुक्यात झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. मात्र हा पाऊस कोणत्या कारणांमुळे झाला, का झाला, पावसाचे नेमके कारण काय? याची हवामान खात्याकडून माहीती घेण्यासाठी कृषी विभाग फारसा प्रयत्नशील नसल्याचे दिसले. नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढत असतानाच पावसाचा शिरकाव झाल्याने वातावरणात अचानक बदल झाला. त्यामुळे द्राक्षांवर रोगाचा पार्द्रुभाव होवू नये, म्हणून शेतकऱ्यांना द्राक्ष बागांमध्ये धूर व किटकनाशकांची फवारणी करावी लागली. जिल्हयात द्राक्ष पिकाखालील क्षेत्र ५२ हजार ३८६ हेक्टर असून, त्यात सर्वाधिक निफाड तालुक्यात १९ हजार ९६६ हेक्टर त्यानंतर दिंडोरीत १५ हजर १६७ हेक्टर व नाशिकमध्ये ११ हजार ६७१ हेक्ट तसेच चांदवड तालुक्यात ३ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र आहे. यात थॉमसन सिडलेस, सोनाका, तास-इ- गणेश, एच-५, क्रिमसन, फनटासी क्लोन-२ या द्राक्ष जातींची लागवड केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागायतरांना फटका बसण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments