Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्र'अठरा मंत्र्यांचेच अच्छे दिन''; कोटीच्या कोटी उड्डाने!

‘अठरा मंत्र्यांचेच अच्छे दिन”; कोटीच्या कोटी उड्डाने!

Within five years, the wealth of BJP ministers increased
सबका साथ सबका विकास म्हणा-या सत्ताधारी भाजप, सेनेच्या अठरा मंत्र्यांचाच विकास झाला. पाच वर्षांमध्ये १८ मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये १४२ कोटी ५० लाखांनी वाढ झाली आहे. ही धक्कादायक माहिती मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रामधूनच समोर आली आहे.

सध्याच्या मंत्रीमंडळातील भाजपाच्या तिकीटावर लढणाऱ्या १८ उमेदवारांची सरासरी संपत्ती मागील पाच वर्षांमध्ये ८० टक्क्यांने वाढली. या १८ नेत्यांनी २०१४ साली सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील एकूण संपत्ती १७९ कोटी ८० लाख इतकी होती. हाच आकडा २०१९ साली ३२२ कोटी ५० लाख इतका झाला आहे.

संपत्तीमध्ये सर्वाधिक वाढ झालेले नेते

पंकजा मुंडे (महिला व बालविकास मंत्री) (भाजपा)
२०१४ मधील संपत्ती १३ कोटी ७० लाख
२०१९ मधील संपत्ती ३५ कोटी ४० लाख
एकूण वाढ – २१ कोटी ७० लाख

बबनराव लोणीकर (पाणीपुरवठामंत्री) (भाजपा)
२०१४ मधील संपत्ती २ कोटी ३० लाख
२०१९ मधील संपत्ती २९ कोटी ४० लाख
एकूण वाढ – २७ कोटी १० लाख

सुभाष देशमुख (सहकार मंत्री) (भाजपा)
२०१४ मधील संपत्ती ३१ कोटी ९० लाख
२०१९ मधील संपत्ती ४८ कोटी ५० लाख
एकूण वाढ – १६ कोटी ६० लाख

जयदत्त क्षीरसागर (रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री) (शिवसेना)
२०१४ मधील संपत्ती ४४ कोटी ७० लाख
२०१९ मधील संपत्ती ५७ कोटी ७० लाख
एकूण वाढ – १३ कोटी

आशिष शेलार (शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री) (भाजपा)
२०१४ मधील संपत्ती ५ कोटी
२०१९ मधील संपत्ती १४ कोटी ६० लाख
एकूण वाढ – ९ कोटी ६० लाख

संपत्तीमध्ये सर्वात कमी वाढ झालेले नेते

सुरेश खाडे (सामाजिक न्याय मंत्री) (भाजपा)
२०१४ मधील संपत्ती ४ कोटी ८८ लाख
२०१९ मधील संपत्ती ४ कोटी ९४ लाख
एकूण वाढ – ६ लाख

अशोक उईके (आदिवासी विकास मंत्री) (भाजपा)
२०१४ मधील संपत्ती ८६ लाख
२०१९ मधील संपत्ती १ कोटी ५१ लाख
एकूण वाढ – ६५ लाख

राम शिंदे (पणन व वस्त्रोद्योग मंत्री) (भाजपा)
२०१४ मधील संपत्ती ७२ लाख ८० हजार
२०१९ मधील संपत्ती २ कोटी ५० लाख
एकूण वाढ – १ कोटी ८० लाख

जयकुमार रावळ (अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री) (भाजपा)
२०१४ मधील संपत्ती १३ कोटी
२०१९ मधील संपत्ती १६ कोटी ५० लाख
एकूण वाढ – ३ कोटी ५० लाख

संजय कुटे (कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री) (भाजपा)
२०१४ मधील संपत्ती ४ कोटी ९४ लाख
२०१९ मधील संपत्ती ६ कोटी ८७ लाख
एकूण वाढ – १ कोटी ९३ लाख

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments