Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रघरातूनचं काम करा, आरोग्याची काळजी घ्या - शरद पवार

घरातूनचं काम करा, आरोग्याची काळजी घ्या – शरद पवार

Sharad Pawarमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्याच्या आणि देशाच्या जनतेला हे आवाहन केलं आहे की करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन बाहेर पडू नका. मी देखील घरातच बसलो आहे.
घरात बसून मी वाचन करतो आहे आपल्या कुटुंबीयांची काळजी घेतो आहे. त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांचं काटेकोरपणे पालन करा असंही आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यामध्ये आपणही घरी वाचन करत असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. तसंच अत्यंत महत्त्वाची गरज असल्याशिवाय बाहेर पडू नका असंही ते म्हणाले आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments