संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापणार?

- Advertisement -

मुंबई : ऐन दिवाळीत संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार कापला जाणार आहे. ३६ दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला.

चार दिवस पुकारलेल्या संप आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कापण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. सहा महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने संपकरी कर्मचाऱ्यांच्या पगार कापला जाणार आहे.  एक दिवस संपाचा दंड म्हणून ७ दिवसांचा पगार कापणार आहे.  महामंडळाच्या या निर्णयाबद्दल कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीये. पगार  कापला तर पुन्हा वाद चिघळण्याची शक्यता असून,एस.टी.च्या विविध संघटना याकडे कशा प्रकारे विरोध करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -