Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रलग्न ठरत नसल्याने तरुणाने घेतला गळफास!

लग्न ठरत नसल्याने तरुणाने घेतला गळफास!

सातारा: लग्न करण्याची इच्छा होती परंतु कुठेही लग्न जुळत नव्हत. वाढत वय या चिंतेत साताऱ्यात एका तरुणाने चक्क आयुष्य संपवलं. नितीन शेंडगे असं या २८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो वाई तालुक्यातील बदेवाडी गावातील रहिवासी होता. नितीनने आज सकाळी लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला.या प्रकारामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नितीन गेल्या अनेक दिवसांपासून लग्नासाठी मुली पाहात होता. मात्र त्याचं लग्न जुळत नव्हतं. त्याच नैराश्यातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेची नोंद भुईज पोलीस ठाण्यात झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments