अन्…सैफ इनायापासून तैमुरला ठेवतोय दूर!

- Advertisement -

सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमुरची नेहमीच चर्चा होत असते. गेल्याच महिन्यात तैमुर एक वर्षाचा झाला. आपल्या देखण्या रुपाने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या तैमुरच्या काही गोष्टींनी सैफ मात्र चिंतेत आहे. छोटा नवाब आता मोठा होत असल्याने बाल्यावस्थेतील त्याच्या खोडींना सुरुवात झाली आहे. वस्तू ओरबाडणे किंवा हातात मिळेल ते फेकून देणे अशा काही गोष्टी तो करू लागला आहे. त्याच्या याच सवयींमुळे तो जेव्हा सोहाची मुलगी इनायाला भेटतो तेव्हा सैफला काळजी वाटते. कारण, तैमुर चुकून आपल्या चिमुकल्या भाचीला दुखापत करणार नाही ना, असा विचार त्याच्या मनात सतत येत असतो. याबद्दलचा स्वतः सोहा अली खान म्हणाली.

सोहाने नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिने तैमुर आणि इनायाबद्दलही काही गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली की, लहान मुलं रांगायला लागली की ती आजूबाजूच्या वस्तूंची उलथापालथ करतात. तैमुरमध्येही बदल घडत असून तो हातात कोणतीही गोष्ट घट्ट पकडून ठेवतो. त्याचसोबत तो आता ओरबाडून हातात मिळेल ते फेकतो. इनाया खूपच लहान असल्याने हे दोघंही एकत्र असल्यावर आम्हाला खूपच काळजी वाटते. तैमुर इनायाजवळ जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खासकरून, भाई (सैफ) अधिक चिंतेत असतो.

तैमुर आणि इनायामध्ये अवघ्या काही महिन्यांचाच फरक आहे. याबद्ल सोहा म्हणाली की, भाई आणि माझ्यामध्ये आठ वर्षांचा फरक आहे. पण, तैमुर आणि इनायामध्ये काही महिन्यांचाच फरक आहे. ते जसजसे मोठे होतील तशी त्यांच्यात अधिक जवळीक निर्माण होऊन ते एकमेकांचे चांगले मित्र होतील अशी माझी इच्छा आहे. तैमुर हा इनायापेक्षा मोठा असल्याने तो नेहमीच तिची मोठ्या भावाप्रमाणे काळजी घेईल.

- Advertisement -
- Advertisement -