अबराम बिग बींना शाहरूखचे वडील समजतो

- Advertisement -

ऐश्वर्या आणि अभिषेक यांची मुलगी आराध्याचा वाढदिवस मोठा जंगी साजरा झाला. यावेळी शाहरूखही अबरामला घेऊन आला होता. या वाढदिवसाच्या सोहळ्याबद्दल बिग बींनी सोशल मीडियावर म्हटलंय, ‘हा आहे अबराम ज्युनियर शाहरूख खान आहे. याला हवा होता बुढ्ढीचा बाल‘. आम्ही त्याला तिथपर्यंत घेऊन गेलो. तो बनेपर्यंत त्यानं वाट पाहिली आणि एकदा का तो तयार झाला, तेव्हा अबरामच्या चेहऱ्यावरचे भाव अद्भुत होत.

याला शाहरूखनंही उत्तर दिलंय. तो म्हणतो, ‘थँक्यू सर, हा क्षण नेहमीच लक्षात राहील. एक गोष्ट सांगतो, जेव्हा जेव्हा अबराम तुम्हाला टीव्हीवर पाहतो, तेव्हा तो तुम्हाला माझे वडील समजतो.’  आराध्या वाढदिवसाला अख्खं बॉलिवूड हजर होतं.

- Advertisement -