अमृता फडणवीस यांचा पंजाबी गाण्याला आवाज

- Advertisement -

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मराठी आणि हिंदीनंतर आता पंजाबी गाण्याला आपला आवाज दिला आहे. नुकताच त्यांचा पहिला पंजाबी म्युझिक अल्बम रिलीज करण्यात आला आहे. या अल्बममध्ये अमृता फडणवीस यांचा एक वेगळा अंदाज सर्वांना पहायला मिळणार आहे. या अल्बममध्ये अमृता फडणवीस पंजाबी/बॉलिवूड मिक्स गाणी गाताना दिसत आहेत. यू-ट्यूबवर गाण्याचा व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे. अमृता फडणवीस यांनी स्वत: ट्विट करत म्युझिक अल्बमची माहिती दिली आहे. 

अमृता फडणवीस यांच्या म्युझिक अल्बमला ‘साड्डी गली/रेल गड्डी’ असं नाव देण्यात आलं आहे. सुमारे चार मिनिटांचा हा अल्बम टी-सीरिजने रिलीज केला आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, ‘पाहा आणि ऐका धम्माल गाणं साड्डी गली/रेल गड्डी’. अल्बममध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत पंजाबी गायक दीप मोनी आणि प्रीत हरपाल यांनीही आपला आवाज दिला आहे.

- Advertisement -
- Advertisement -