एक्स पतीच्या पत्नीसोबत आपल्या मुलांचे फोटो बघताच करिश्मा कपूरने घेतला ‘हा’ निर्णय!

- Advertisement -

अभिनेत्री करिश्मा कपूरची मुलगी समायरा आणि मुलगा कियान पापा संजय कपूरला भेटण्यासाठी नुकतेच दिल्लीला गेले होते. यावेळी संजय कपूरची दुसरी पत्नी प्रिया सचदेव हिने सोशल मीडियावर मुलांसोबतचे काही फोटो पोस्ट केले. ज्यामध्ये दोन्ही मुले खूपच आनंदी असल्याचे दिसत आहे. मात्र या फोटोमुळे करिश्माला अजिबातच आनंद झाला नसावा असे दिसत आहे. होय, आज करिश्मा मुलगा कियान आणि पूर्व पती संजय कपूरसोबत एका रेस्टॉरंटच्या बाहेर येताना दिसली. यावेळी करिश्माचा मुलगा कियान शाळेच्या ड्रेसवर होता, तर करिश्मा कपूर पांढºया रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पॅण्ट अशा लूकमध्ये होती. यावेळी करिश्माने या ड्रेसवर ब्लॅक जॅकेटही कॅरी केले होते, तर संजय कपूर अतिशय कॅज्युअल लूकमध्ये बघावयास मिळाला.

करिश्मा ज्यापद्धतीने मुलगा कियानसोबत दिसत होती, त्यावरून तिला पूर्व पतीच्या पत्नीने मुलांसोबत काढलेले फोटो अजिबातच पसंत आले नसावे असेच दिसत होते. कारण तिने मुलांना त्यांच्या वडिलांकडून थेट शाळेत पाठविण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे कियान या निर्णयामुळे फारसा आनंदी दिसत नव्हता. त्याच्या चेहºयावरील हावभाव त्याकडे इशारा देत होते. कदाचित याचकारणामुळे संजय कपूरनेही मुलासोबत शाळेत जाण्याचा निर्णय घेतला असावा.

दरम्यान, करिश्मा आणि संजय यांनी १३ वर्षे संसार केल्यानंतर २०१६ मध्ये घटस्फोट घेतला. कायदेशीरदृष्ट्या दोन्ही मुलांची कस्टडी करिश्मा कपूरकडे आहे. मात्र जेव्हा संजयला मुलांना भेटण्याची इच्छा होईल तेव्हा तो त्यांना भेटू शकतो अशी परवानगीही त्याला न्यायालयाने दिली आहे.

- Advertisement -