‘टायगर जिंदा है’नंतर पुन्हा एकदा सलमान, आणि कॅटरिना एकत्र दिसणार ?

- Advertisement -

गतवर्षी ख्रिसमच्या निमित्ताने  सलमान खान चा टायगर जिंदा है चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. सलमान खानचे फॅन्स या चित्रपटाची वाट मोठ्या आतुरतेने करत होत. तब्बल पाच वर्षांनंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफची केमिस्ट्री बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. या चित्रपटाने  दुसऱ्या आठवड्यात ८५ कोटी तर तिसऱ्या आठवड्यात २७ कोटी रुपयांचे कलेक्शन करीत तीनशे कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविले. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शच्या मते, ११ जानेवारीपर्यंत या चित्रपटाने ३१८.८६ कोटी रुपयांची कमाई केली. विदेशात १२२.१२ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. एकूणच या चित्रपटाने जगभरात ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कलेक्शन केले आहे. पाचशे कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविणारा सलमानचा हा तिसरा चित्रपट ठरला आहे.

सध्या सलमान खान ‘भारत’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. रिलीजच्या आधी हा चित्रपट त्याच्या नावामुळे वादात सापडला आहे. या शूटींगची पूर्वतयारी सध्या सुरु आहे. अली अब्बास जफर या चित्रपटाचा दिग्दर्शक असेल. अभिनेता व निर्माता अतुल अग्निहोत्री (सलमानची बहीण अलविरा खान हिचा पती) दीर्घकाळापासून या चित्रपटाचे प्लानिंग करतोय. पण कुठल्या ना कुठल्या कारणाने हा चित्रपट रखडत चालला होता. सर्वप्रथम हा चित्रपट राजकुमार संतोषी यांनीच दिग्दर्शित करावा, असे अतुल व सलमानला वाटत होते. अली अब्बास या चित्रपटात सलमानसोबत कॅटरिना कैफला घेण्याचा विचार करतो आहे.
अलीने डीएनएला दिलेल्या इंटरव्हु दरम्यान सांगितले की, अजून या चित्रपटाची स्टारकास्ट फायनल करण्यात आलेली नाही. मात्र जेव्हा मी चित्रपटातील अभिनेत्रीबाबत विचार करतो तेव्हा माझ्या डोक्यात कॅटरिना कैफचे नाव येते. ती या भूमिकेसाठी फिट आहे. मी या रोलसाठी तिला ऑफर देऊ शकतो. मात्र अद्याप याबाबत काही निर्णय झालेला नाही. कॅटरिना माझी जवळ्याच्या मैत्रिणींनी पैकी एक आहे.
कॅटरिनाला अलीने अप्रोच केल्यानंतर ती त्यांना हा बोलते की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. कॅटरिनाने जर होकार दिला तर पुन्हा एकदा सलमान आणि कॅटरिनाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहाता येणार आहे.

- Advertisement -