होम मनोरंजन तब्बूची साडी इस्त्री करणारा झाला दिग्दर्शक!

तब्बूची साडी इस्त्री करणारा झाला दिग्दर्शक!

10
0
शेयर

भाग्य आजमावतांना जे काम मिळेल ते काम यशस्वीपणे पूर्ण करुन पुढील वाटचालीचा शोध घेणारे बरेच असतात. सर्वसामान्यपणे कोणतंही काम छोटं नसतं असं आपण म्हणतो. पण आपल्या नजरेतून कमी दर्ज्याची वाटणारी कामं जेव्हा करावी लागतात तेव्हा त्याला मन तयार होत नाही. मनोरंजन क्षेत्राचंही काहीसं असंच आहे. पण नशीब त्यांचेच बदलते ज्यांना कोणतेही काम कमी दर्जाचे वाटत नाही. हे कदाचित तुम्हाला फार पुस्तकी वाटेल पण आम्ही आता तुम्हाला अशा दिग्दर्शकाचं नाव सांगणार आहोत ज्याचे नाव वाचून तुमच्या भुवया नक्कीच उंचावतील.

बॉलिवूडमध्ये हिट अॅक्शन सिनेमांचे दिग्दर्शन करणारा रोहित शेट्टी त्याच्या करिअरच्या सुरूवातीला अभिनेत्री तब्बूच्या साड्या इस्त्री करायचा. बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शकांची जर यादी काढायची झाली तर रोहितचं नाव पहिल्या काही नावांमध्ये नक्कीच असेल. पण त्याचा यशस्वी दिग्दर्शक होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता.

रोहितने त्याच्या करिअरची सुरूवात स्पॉटबॉय म्हणून केली. स्पॉटबॉय असताना तो तब्बूच्या साड्यांना इस्त्री करायचा. तसेच काजोलचा मेकअपही करायचा. हे आम्ही नाही तर स्वतः रोहितनेच सांगितले आहे. इंडियाज नेक्स्ट सुपरस्टारमध्ये रोहितने त्याच्या आयुष्यातील काही घटनांचा खुलासा केला. रोहितने सांगितले की, तो हकीकत सिनेमाच्या सेटवर स्पॉटबॉय म्हणून काम करत होता. यावेळी त्याने तब्बूच्या साड्या इस्त्री करण्यापासून काजोलचा मेकअप करेपर्यंत आणि तिचे केस विंचरेपर्यंतची सर्व कामं केली आहेत. पण अथक मेहनतीने त्याने स्वतःला वेळोवेळी सिद्ध केले. आता तर रोहितने तब्बू आणि काजोल या दोन्ही अभिनेत्रींसोबत सिनेमात कामंही केले.

रोहितने तब्बू आणि अजय देवगनसोबत सुपहिट ‘गोलमाल अगेन’ सिनेमा केला. त्याआधी त्याने काजोलसोबत दिलावाले सिनेमात काम केलं होतं. दिलवाले सिनेमात काजोल- शाहरुख ही सुपरहिट जोडी दिसली होती. रोहतच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो सिम्बा सिनेमाच्या कामात व्यग्र आहे. या सिनेमात रणवीर सिंग दिसणार आहे. रणवीर आणि रोहितने याआधी चिंग मसाल्याच्या जाहिरातीसाठी एकत्र काम केले होते.