दीपिका पादुकोणने घेतला एक मोठा निर्णय!

- Advertisement -

‘पद्मावत’ या चित्रपटाला जितके अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय, तितकाच अभूतपूर्व विरोधही झालाय. अद्यापही हा विरोध मावळला नाही. अगदी शूटींगच्या पहिल्या दिवसापासूनच हा सिनेमा वादात सापडला आणि पुढे रिलीच्या तोंडावर तर हा वाद आणखीच चिघळला. ‘पद्मावत’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना मारहाण ते जीवे मारण्याच्या धमक्या विरोधकांनी दिल्या. केवळ इतकेच नाही तर चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे नाक कापण्याची धमकी देण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली. हा इतका विरोध पाहून दीपिकाने म्हणे एक मोठा निर्णय घेतला आहे. होय, यापुढे कुठलीही ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारायची नाही, असे म्हणे दीपिकाने ठरवून टाकले आहे.

अलीकडे एका इ्व्हेंटमध्ये दीपिकाला याबद्दल विचारण्यात आले, यावर दीपिकाने याबद्दल खुलासा केला. भविष्यातही तू ‘पद्मावत’सारखे चित्रपट करणार का? असा प्रश्न तिला केला गेला. यावर ‘इतना सब होने के बाद कभी नहीं,’ असे उत्तर दीपिकाने दिले.  करणी सेनेच्या धमक्या आणि विरोधानंतर मी स्वत:ला सांभाळू शकते, याची माझ्या पालकांना पूर्ण खात्री होती. योग्य आणि अयोग्य यांच्यातील फरक त्यांनी आम्हा दोघी बहिणींना शिकवला आहे. सत्यासोबत खंबीरपणे उभे राहायचे त्यांनी आम्हाला शिकवलेय. मी तेच केले, असेही ती म्हणाली.
या चित्रपटातील तुझा सर्वाधिक आवडता सीन कुठला? असे तिला विचारले गेले. यावर खिल्जी आणि रावल यांच्यातील लढाई मला प्रचंड आवडली. दोन लीडिंग स्टार्समधील असा अ‍ॅक्शन सीन मी याआधी कधीही पाहिलेला नाही. असे वाटते, जणू ते प्रत्यक्षात लढत आहेत, असे ती म्हणाली.
‘पद्मावत’ पाहिल्यानंतरची तुझ्या पालकांची प्रतिक्रिया काय होती, असा एक प्रश्नही तिला केला गेला. यावर दीपिका काहीशी भावूक झाली. स्पेशल स्क्रिनिंगनंतर मी झोपायला निघाले असताना मम्मी-पप्पांचा व्हिडिओ कॉल आला.  आम्हाला तुझा अभिमान आहे, असे ते मला म्हणाले. त्यांचे आनंदाने खुललेले चेहरे मी पाहू शकत होते. पडद्यावर मला अशा भूमिकेत पाहणे, त्यांच्यासाठी आश्चर्यकारक होते. ही खरोखरीच आमची मुलगी आहे? अशी त्यांची त्याक्षणीची प्रतिक्रिया होती.

- Advertisement -