प्रार्थना बेहरे अभिषेकसोबत लग्नबंधनात अडकणार

- Advertisement -

प्रार्थना बेहरेने पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतील तिची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या मराठी सिनेमातून एंट्री मारत तिने रसिकांची मने जिंकली. यानंतर ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ या सिनेमातून तिच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. आज प्रार्थनाचे फॅन फॉलोव्हिंग प्रचंड आहे. तिच्या चाहत्यांसाठी एक खूपच चांगली बातमी आहे. प्रार्थनाने दिग्दर्शक अभिषेक जावकरसोबत काही दिवसांपूर्वीच साखरपुडा केला होता आणि ती अभिषेकसोबत १४ नोव्हेंबर २०१७ ला लग्नबंधनात अडकणार आहेत.

प्रार्थनानेच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर साखरपुड्याचा फोटो पोस्ट करून तिच्या फॅन्सना याबाबत सांगितले होते. या फोटो सोबत आम्ही दोघांनी आयुष्यभर एकत्र राहायचे ठरवले आहे असे कॅप्शन देखील लिहिले होते. या फोटोत प्रार्थनाने खूपच सुंदर निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता तर अभिषेकदेखील निळ्या रंगाच्या शर्टमध्ये आणि कोटमध्ये दिसत होता. या फोटोत त्या दोघांची अंगठी देखील आपल्याला पाहायला मिळाली होती.

- Advertisement -

अभिषेक हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्टिब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. डब्बा एैस पैस, सॉल्ट आणि प्रेम यांसारख्या मराठी चित्रपटाची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.

१४ नोव्हेंबर २०१७ ला प्रार्थना आणि अभिषेक लग्नबंधनात अडकणार आहेत. प्रार्थना आणि अभिषेकचे हे अरेंज मॅरेज असून एका मॅरेज ब्यूरोच्या मदतीने तिची आणि अभिषेकची ओळख झाली. तो दोघे डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा होती. ते कुठे लग्न करणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता होती. त्यांच्या लग्नाचे स्थळ आता ठरले असून ते दोघे गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. प्रार्थनाच्या मराठी इंड्स्ट्रीतील अनेक मित्रमैत्रिणी लग्नाच्या एक दिवस आधी तरी गोव्याला रवाना होणार आहेत. प्रार्थनाच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. प्रार्थनाच्या लग्नासाठी तिच्या इतकेच तिचे इंडस्ट्रीतील फ्रेंड्स देखील उत्सुक आहेत.

- Advertisement -