बॉक्सिंगवरील अभिनेता सुदीप पांडे याचा हिंदी चित्रपट ‘वी फॉर विक्टर’ मार्च मध्ये रिलीज होणार

- Advertisement -

मिथुन चक्रवर्ती अभिनीत बॉक्सर‘, धर्मेंद्रचा अपने‘, प्रियंका चोप्राचा मेरी कोम‘ आणि अनुराग कश्यप यांचा मुक्काबाज‘ हे बॉक्सिंगवर बनलेले चित्रपट खूपच गाजले. त्यातच आता भोजपुरीतील सुपरहीट एक्शन हीरो सुदीप पांडे याची प्रमुख भूमिका असलेल्या वी फॉर विक्टर‘ हा हिंदी चित्रपट मार्च २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे. सुदीप पांडे याने भोजपुरी भाषेत असंख्य चित्रपट केल्यानंतर बॉलीवूडच्या हिंदी सिनेमात तो प्रमुख भूमिकेत चमकणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन एस. कुमार यांनी केले आहे.

आपल्या वी फॉर विक्टर‘ एक्शन सिनेमाबद्दल बोलताना अभिनेता सुदीप पांडे म्हणतो, “या सिनेमात एका बॉक्सरच्या जीवनातील चढउतार दाखवण्यात आले आहेत. यात मी विक्टर नावाची व्यक्तिरेखा साकारतोय. हा एक सर्वसामान्य माणूस आहे. कुठल्याही परिस्थितीत त्याला प्रसिद्ध बॉक्सर बनायचे आहे. बॉक्सर बनून तो देशाच्या हिताचे काम कसे करतो ते पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. हा एक संगीतमयकौटुंबीक आणि एक्शनने परिपूर्ण असा चित्रपट आहे.” 

- Advertisement -

वी फॉर विक्टर‘ या सिनेमात बंगाली अभिनेत्री पामेलादक्षिणेतील स्टार अभिनेत्री रूबी परिहारनसीर अब्दुल्लाउषा वाच्छानीरासुल टंडनसंजय स्वराज वगैरेंच्याही प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमात प्रथमच सुदर्शन न्यूजचे चेयरमन सुरेश चव्हाण हेही अभिनय करताना दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन एस. कुमार यांनी केलेले असून लेखन रमेश मिश्रा (आईएएस) यांनी केले आहेतर संजीव चतुर्वेदी व कृष्णा भारद्वाज यांच्या गीतांना संजीव-दर्शन यांनी संगीत दिले आहे.

- Advertisement -