म्हणे ‘भारतात सामान्य मुलींपेक्षा पोर्नस्टारला अधिक प्रतिष्ठा’!

- Advertisement -

दक्षिण भारतीय चित्रपटातील आघाडीची नायिका पूनम कौर ही सध्या तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. पूनमने पोर्नस्टारविषयी वक्तव्य केल्याने तिच्यावर चहुबाजूने टीका होत आहे. पूनमने ट्विट करताना म्हटले होते की, ‘भारतात पोर्नस्टार्सची लाइफ आणि त्यांना मिळणारी प्रतिष्ठा सर्वसामान्य मुलींपेक्षा कित्येक पटीने अधिक आहे. पूनमच्या या ट्विटनंतर तिच्यावर चहुबाजूने टीका केली गेली. जेव्हा ही बाब तिच्या लक्षात आली तेव्हा तिने लगेचच तिचे ट्विट डिलीट केले.

हैदराबाद येथे राहणाºया पूनमने बºयाचशा तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘विनाकुडु’ हा तिचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरल्यानंतर इंडस्ट्रीमधील तिचे स्थान वाढले आहे. वास्तविक पूनमने हे ट्विट पोर्नस्टार मिया माल्कोवा हिच्यावर केले होते. तसेच तिने या ट्विटच्या माध्यमातून अभिनेता कथी महेश याला उत्तरही दिले. ज्यामध्ये तिने पोर्नस्टार मिया माल्कोवा हिच्यावर स्तुतिसुमने उधळली. दरम्यान, कथीने ट्विट करताना म्हटले होते की, मियाचे फिजिक, तिचा आवाज आणि एमएम किरावनी यांचे बॅकग्राउंड म्युझिक ‘गॉड सेक्स आणि ट्रुथ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ठरवितात.
या ट्विटचे उत्तर देताना पूनमने लिहिले होते की, ‘भारतात पोर्नस्टार्सचे आयुष्य आणि प्रतिष्ठा सर्वसामान्य मुलींपेक्षा सरस आहे. मात्र काही वेळानंतर तिला तिचे ट्विट डिलीट करावे लागले. दरम्यान, मिया माल्कोवा लवकरच दिग्दर्शक रामगोपाल वर्माच्या आगामी ‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रुथ’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. डॉक्युमेंट्री बेस्ड असलेल्या या चित्रपटात मिया सेक्स डिझायरविषयी बोलताना दिसत आहे. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला आहे.

- Advertisement -