यशाच्या शिखराव पोहोचवण्याचे श्रेय नीलेशलाच – सोनाक्षी

- Advertisement -

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा मेकअप आर्टिस्ट नीलेश परमार याचा गेल्या मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नीलेशचे वय केवळ ३० वर्षे इतके होते. सोनाक्षी नीलेशला प्रेमाने नीलू असे म्हणत असे. सोनाक्षीने नीलेशसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना ‘Life wont ever be the same again without this one’ असे लिहिले. नीलेश सोनाक्षीच्या खूप क्लोज होता. सोनाक्षीने एकदा तिच्या मित्रांना सांगिंतले होते की, आज मी ज्या यशाच्या शिखरावर आहे, त्याचे सर्व श्रेय नीलेशला जाते.

विशेष म्हणजे नीलेश परमार सोनाक्षीच्या फॅमिलीचाच एक भाग होता. २०१३ मध्ये गणेश चतुर्थीचा दिवस होता आणि सोनाक्षी शूटिंगमध्ये व्यस्त होती. त्या दिवशी नीलेशचाही बर्थ डे होता. मात्र अशातही त्याने सुटी न घेता सोनाक्षीसोबत तो काम करीत राहिला. सोनाक्षीला माहिती होते की, आज नीलेशचा बर्थ डे आहे. पुढे तिने नीलेशला चित्रपटाच्या सेटवरच एक सरप्राइज पार्टी दिली. तसेच केकही कापला. यावेळी सोनाक्षीने तिची व्हॅनिटी व्हॅनही बलूनने डेकोरेट केली होती.
नीलेश सोनाक्षीसोबत तिचा पहिला ‘दबंग’ या चित्रपटापासून काम करीत होता. खरं तर इंडस्ट्रीमध्ये बरेचसे मेकअप आर्टिस्ट आहेत. परंतु सोनाक्षीने नीलेशची निवड केली होती. सोनाक्षीच्या मते, नीलेश नॉन स्टॉप एंटरटेनमेंटचा सोर्स आहे.

- Advertisement -