राखीने चक्क आंघोळ करतानाचा फोटो केला शेअर!

- Advertisement -

आयटम गर्ल राखी सावंत हिला प्रसिद्धी कशी मिळवावी हे चांगलेच ठाऊक आहे. काहीतरी विक्षिप्त फोटो किंवा वादग्रस्त वक्तव्य करून ती स्वत:ला मीडियामध्ये मिरविते. थोडक्यात काय तर प्रसिद्धीला हापापलेली राखी कधी काय करेल याचा काही भरवसाच नाही. आता तर तिने चक्क आंघोळ करतानाचा फोटो शेअर करून लाइमलाइटमध्ये येण्याचा प्रयत्न केला. होय, राखीने आंघोळ करताना फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली असून, तिच्या या प्रतापाचा यूजर्सकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे. खरं तर या वर्षाच्या सुरुवातीलाच राखी तिच्या एका बोल्ड फोटोवरून यूजर्सच्या निशाण्यावर आली होती. आता पुन्हा एकदा तिने यूजर्सच्या हाती आयतेच कोलीत दिले आहे. 

राखीने २०१८ च्या सुरुवातीला एक बिकिनी फोटो शेअर केला होता. त्यामध्ये ती खूप बोल्ड अंदाजात दिसत होती. फोटोमध्ये तिने लाल आणि काळ्या रंगाचा प्रिंटेट स्विमसूट घातला होता. स्विमिंग पुलाच्या काठावर बसलेल्या राखीने यावेळी गॉगल घातला होता. मात्र तिचा हा अंदाज यूजर्सला अजिबातच आवडला नाही. त्यांनी तिच्या फोटोला अतिशय अश्लील अशा स्वरूपाच्या कॉमेण्ट दिल्या. अनेकांनी तर तिला ‘पाणघोडा’ असे संबोधले. तिच्या या फोटोला २३ तासांच्या आतच पाच हजारांपेक्षा अधिक लाइक्स मिळाल्या होत्या.
आता राखीने आंघोळ करतानाचा फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. बाथटबमध्ये बसलेली राखी आंघोळ करताना दिसत आहे. राखीने हा फोटो शेअर करताच तिला यूजर्सकडून ट्रोल केले जात आहे. तिच्या या फोटोला यूजर्सकडून उलट सुलट प्रतिक्रिया दिल्या जात आहे. गेल्या काहीकाळापासून राखी तिच्या कंडोम ब्रॅण्डच्या जाहिरातीवरून चर्चेत आहे. याविषयीचे काही व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर करून खळबळ उडवून दिली होती.

- Advertisement -