शाहरुखला एअरपोर्टवर सोडण्यासाठी ममता बॅनर्जीं स्वत: कारघेऊन येतात तेंव्हा…!

- Advertisement -

कोलकाता: अभिनेता शाहरुख खानने कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला उपस्थिती लावली. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शाहरुखला आपल्या सॅन्ट्रो कारने एयरपोर्टपर्यंत सोडलं.

ममता बॅनर्जी यांनी एयरपोर्टला गाडी आल्यानंतर गाडीमधून उतरून शाहरुखसाठी गाडीचा दरवाजा उघडून दिला, तर शाहरूखनेही गाडीतून उतरून ममता यांचे आशीर्वाद घेतले. शाहरुख खानने ममतांच्या पाया पडून त्यांना वंदन केलं. कोलकात्यात शुक्रवारी ममता बॅनर्जींसह बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान, महेश भट्ट, कमल हसन आणि काजोल यांच्या उपस्थितीत, २३ व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली.

- Advertisement -

या कार्यक्रमानंतर शाहरुख खान मुंबईकडे येण्यासाठी कोलकात्यातील एअरपोर्टकडे निघाला. त्यावेळी स्वत: ममता बॅनर्जी यांनी शाहरुखला स्वत:च्या गाडीतून विमानतळापर्यंत सोडलं. ममतांच्या सँट्रो कारमध्ये शाहरुख मागील सीटवर बसला होता. विमानतळावर उतरल्यानंतर शाहरुख ममतांच्या पाया पडला.

शाहरुख आणि ममतांचे चांगले संबंध आहेत. ममतांनी शाहरुखला पश्चिम बंगालचा ब्रँड अम्बेसेडरही बनवलं आहे. शाहरुखही ममतांना बहिण मानतो. त्याच प्रेमातून महागड्या गाड्यातून फिरणारा शाहरुख सँट्रो कारमध्ये बसायला कतरला नाही.

- Advertisement -