सलमान आणि कॅटरिनाच्या ब्रेकअपमुळे डेजी शहाला मिळाली चमकण्याची संधी?

- Advertisement -

बॉलिवूड स्टार डेजी शहाला सलमान खान इंडस्ट्रीत घेऊन आल्याचे म्हटले जाते. याच संदर्भात अनेक कथा ही सांगितल्या जातात. मात्र डेजीला इंडस्ट्रीत जागा मिळवून देण्यामागे कॅटरिना कैफचा सुद्धा हात आहे. सलमानसोबत झालेले कॅटरिना कैफचे ब्रेकअप सगळ्यांना माहिती आहे. या ब्रेकअपमुळेच डेजीला इंडस्ट्रीत झकण्याचा चान्स मिळाला होता. स्पॉट बॉयच्या रिपोर्टनुसार सलमान आणि कॅटरिनाची ब्रेकअपच्या आधीची भेट खूपच इंटेंस होती. सलमानने कॅटरिनाला सांगितले होती की आज ती तिच्यामुळे स्टार झाली आहे. यावर कॅटरिनाने उत्तर दिले होते मी आज स्टारर आहे ते माझ्यामध्ये असलेल्या टैलेंटमुळे आणि असेच जर असेल तर तू  कुणाला ही तू स्टार बनवू शकतोस. यावर कॅटरिनाला उत्तर देताना सलमान म्हणाला मी एक बॅकग्राऊंड डान्सरला ही स्टार बनवू शकतो. 

डेजीने तब्बल दोन वर्षे गणेश आचार्य यांच्या ग्रुपमध्ये डान्सर म्हणून काम केले. पुढे त्यांची डान्स असिस्टंट म्हणूनही तिने काम केले. या व्यतिरिक्त ती मॉडलिंगमध्ये करिअर करीत होती. याचदरम्यान तिला २००३ मध्ये आलेल्या सलमान खानच्या एका सुपरहिट चित्रपटात बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. होय, २००३ मध्ये आलेल्या ‘तेरे नाम’ या चित्रपटात डेजीने बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले होते. परंतु तिला कोणीही त्यावेळी नोटीस केले नव्हते. याच दरम्यान एकदा डेजी ग्रुपला डान्स शिकवत होती तेव्हा सलमानची नजर तिच्यावर गेली. सलमानने डेजीला स्टार बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांने डेजीला बॉलिवूडमध्ये लाँच केले. डेजीने सलमान स्टारर ‘जय हो’मधून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात ती सलमानच्या अपोझिट दिसली. वास्तविक डेजीने २०११ मध्येच कन्नडमधील ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती. त्याचबरोबर २००३ मध्ये आलेल्या सलमानच्या एका सुपरहिट चित्रपटातही डेजी शाह झळकली होती. असो, डेजी पुन्हा एकदा सलमानसोबत आगामी ‘रेस-३’मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -