सारा अली खानने ‘या’ साउथ सुपरस्टारसोबत साइन केला नवा चित्रपट!

- Advertisement -

सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान हिचा अद्यापपर्यंत एकही चित्रपट रिलीज झाला नाही; मात्र इंडस्ट्रीत तिची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. कारण सातत्याने मीडियामध्ये या बातम्या येत आहेत की, बरेचसे दिग्दर्शक सारा अली खानसोबत चित्रपट करण्यास उत्सुक आहेत. वृत्तानुसार सारा अली खानकडे एका साउथ चित्रपटाची फर आहे. ज्यामध्ये बाहुबलीसिरीजमधून प्रचंड लोकप्रिय झालेला अभिनेता प्रभाससोबत ती बघावयास मिळणार आहे.

ग्लूट डॉट कॉमच्या एका वृत्तानुसार, प्रभास सध्या त्याच्या आगामी बिग बजट ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर त्याने एक नवा चित्रपटही साइन केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार करणार आहेत. या चित्रपटाची शूटिंग याच वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून सुरू केली जाणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांचीच ही इच्छा आहे की, सारा अली खान प्रभाससोबत मुख्य भूमिकेत असावी. वृत्तात सांगण्यात आले की, दिग्दर्शक राधाकृष्ण कुमार यांनी सर्वांत अगोदर या भूमिकेसाठी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्याशी चर्चा केली. त्यांनी दीपिकाला चित्रपटाची स्क्रिप्टही ऐकविली. मात्र दीपिकाने बराच काळ निर्मात्यांना काही उत्तर दिले नसल्याने राधाकृष्ण यांनी सैफची मुलगी साराला या चित्रपटात साइन करण्याचा निर्णय घेतला.
सूत्रानुसार, साराला या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली आहे. मात्र आई अमृताने अद्यापपर्यंत याविषयी काहीही निर्णय दिला नसल्याने तिने निर्मात्यांना अजूनपर्यंत होकार कळविला नाही. कारण सारा अली खानच्या करिअरविषयीचे आतापर्यंतचे सर्व मोठे निर्णय अमृता सिंगच घेत आहे. ग्लू डॉट कॉमने त्यांच्या वृत्तात हेदेखील स्पष्ट केले की, साराला करिअरच्या सुरुवातीलाच साउथची अभिनेत्री असा ठपका लावून घ्यायचा नाही. त्यामुळेच तिने अद्यापपर्यंत निर्मात्यांना होकार दिला नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अशा बातम्या आल्या होत्या की, अभिनेता हृतिक रोशन त्याच्या आगामी ‘सुपर ३०’मध्ये सारा अली खानला साइन करू इच्छितो. यासाठी त्याने चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांच्याशी चर्चाही केली. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी अशाही चर्चा रंगल्या होत्या की, सारा अभिनेता रणवीर सिंगच्या नव्या ‘सिम्बा’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करणार आहे.

- Advertisement -