सैफ अली खान किती कोटींच्या संपत्तीचा मालक आहे ? वाचून तुम्हीही व्हाल अवाक

सैफ अली खानला बॉलिवूडचा छोटे नवाब म्हणतात तर करिना कपूर खानला बेगम. नवाब आणि बेगमची बातच न्यारी. तो पतौडी साम्राज्याचा १० वा नवाब आहे.

- Advertisement -

सैफ अली खानला बॉलिवूडचा छोटे नवाब म्हणतात तर करिना कपूर खानला बेगम. नवाब आणि बेगमची बातच न्यारी. सैफचे वडिल मंसूर अली खान पटौदी भोपाळच्या शाही खानदानचे राजकुमार होते. ते भोपाळचे शेवटचे नवाब हामीदुल्ल खान यांचे पणतु होते. नवाब हमीदुल्ल खान यांनी आपली सगळी संपत्ती आपल्या मुलीच्या म्हणजेच मंसूर अली खान पटौदी यांच्या आईच्या नावावर केली होती. त्यामुळे आईनंतर त्याचे सगळी मालकी हक्क मंसूर अली खान पटौदी यांच्याकडे आले आणि त्यानंतर सैफ अली खानकडे. तो पतौडी साम्राज्याचा १० वा नवाब आहे. त्यामुळे त्याचा थाट ही नवाबीच आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. सैफला करिनाने जी साखरपुड्यात अंगठी दिली तिचीच किंमत जवळपास २ कोटी एवढे होती.  सैफच्या ताफ्यात अनेक लॅक्झरी गाड्यांचा समावेश आहे. यात लँड क्रुझर, लेक्सस ४७०, बीएमडब्ल्यू , रेंज रोवर आणि ऑडी या गाड्यांचा समावेश आहे. सैफच्या गाड्यांची लिस्ट खूप मोठी आहे. सैफच्या पणजोबांची भोपाळमध्ये कोट्यावधींची मालमत्ता आहे. गाड्याप्रमाणे सैफला घड्याळांचा ही शॉकिन आहे. त्याच्याकडे अनेक महागडी घडाळं आहेत.

​तैमुर काय सांगायचा प्रयत्न करतोय त्याचे बाबा सैफ अली खानला

- Advertisement -

आज सैफचा शेफ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विदेशात राहणारा एक शेफ अर्थात सैफ अली खान आपल्या मुलासाठी कोचीनला येतो. म्हणजेच यात एका बाप आणि मुलाची शिवाय एका पती-पत्नीच्या घटस्फोटाची कथा आपल्याला यात पाहायला मिळते आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्यादेखील पसंतीस उतरतो आहे. सैफ एका चित्रपटासाठे सहा ते सात कोटी रुपये आणि जाहिरातींसाठी तीन ते चार कोटी रुपयांचे मानधन आकारतो. सैफचा रंगून चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा काही कमाल दाखवू शकला नव्हता. मात्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाल किंवा नाही याचा फारसा परिणाम सैफच्या खासगी आयुष्यावर कधी फारसा होत नाही. कारण तो नेहमीच आपल्या नवाबी अंदाजात दिसतो. सैफला पद्मश्री पुरस्काराने सुद्धा गौरविण्यात आले आहे.

- Advertisement -