Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनऐश-अभिषेक ‘या’ नव्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार!

ऐश-अभिषेक ‘या’ नव्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार!

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची मालमत्ता देशातच नव्हे तर विदेशातही आहे. मात्र सध्या त्यांच्या मुंबईतील एका नव्या घराची चांगलीच चर्चा आहे. या नव्या घरामध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या हे शिफ्ट होणार अशी चर्चा असून अत्यंत सुंदर आणि महागडा असा हा नवीन घर आहे.

होय, कदाचित ही बाब तुम्हाला माहिती नसेल परंतु मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी एक शानदार फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटचा एरिया ५,५०० स्क्वेअर फूट इतका आहे. हा फ्लॅट २०१५ मध्ये २१ कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. मात्र सध्या या फ्लॅटची डिमांड एवढी वाढली की, त्याची किंमत दुपटीने झाली आहे.

वास्तविक असे कितीतरी फ्लॅट ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नावे आहेत. मात्र अद्यापपर्यंत हे निश्चित झाले नाही की, जुहू परिसरातील ‘जलसा’ बंगला सोडून हे दाम्पत्य या फ्लॅटमध्ये केव्हा शिफ्ट होतील? सूत्रानुसार, या बिल्डिंगमध्ये अभिनेत्री सोनम कपूरने एक फ्लॅट खरेदी केला आहे. त्याचा एरिया ७ हजार स्क्वेअर फूट आहे. सोनमने हा फ्लॅट ३५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केला आहे. त्याचबरोबर याच बिल्डरकडून कंगणा राणौत, प्रियंका चोपडा आणि विरुष्कानेही फ्लॅट खरेदी केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शाहरूख खानची पत्नी गौरी खान, अभिषेक आणि ऐश्वर्या दिसत असलेला एक फोटो व्हायरल झाला होता. गौरी सध्या तिच्या जुहू येथील ‘गौरी खान डिझाइन्स’ या स्टोरमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या स्टोरमध्ये बॉलिवूड कलाकारांचे नेहमीच येणे-जाणे असते. असे म्हटले जात आहे की, ऐश-अभिषेक गौरीकडूनच त्यांच्या या फ्लॅटचे काम करू इच्छितात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments