Friday, March 29, 2024
Homeमनोरंजनझायरा वासीम छेडछाड प्रकरण : विकास सचदेवला सशर्त जामीन मंजूर

झायरा वासीम छेडछाड प्रकरण : विकास सचदेवला सशर्त जामीन मंजूर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीम हिच्यासोबत विमानात छेडछाड केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी विकास सचदेव याचा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
मुंबईतील दिंडोशी न्यायालयात विकास सचदेव याच्या जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने विकास सचदेव याचा २५ हजार रुपयांच्या जातमचुलक्यावर सशर्त जामीन बुधवारी मंजूर केला. न्यायालयाने याप्रकरणी विकास सचदेवला १३ डिसेंबर रोजी १५ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 

विस्तारा एअरलाइन्सच्या विमानातून दिल्ली- मुंबई प्रवास करताना बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीम हिच्यासोबत विकास सचदेव याने छेडछाड केली. याप्रकरणी अनेक स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर १० डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांनी घेत दखल घेत विकास सचदेव विरुद्ध विनयभंग व बालक अत्याचार प्रतिबंधक कलम (पॉस्को) गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments