Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeमनोरंजन‘द क्रेनबेरीज’ बँडची लीड सिंगर डोलोरेस ओरिओर्डनचे निधन!

‘द क्रेनबेरीज’ बँडची लीड सिंगर डोलोरेस ओरिओर्डनचे निधन!

जगाच्या पाठीवर द क्रेनबेरीजया बँडचे चाहते अनेक आहेत. याच जगप्रसिद्ध बँडच्या  चाहत्यांसाठी एक दु:खद बातमी आहे. होय, ‘द क्रेनबेरीजची लीड सिंगर डोलोरेस ओरिओर्डन हिचे निधन झाल्याची बातमी आहे.  डोलोरेसच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

डोलोरेस ही ४६ वर्षांची होती. १९९० च्या दशकात  डोलोरेसच्या ‘लिंगर’ आणि ‘जॉम्बी’सारख्या गाण्यांनी ‘द क्रेनबेरीज’ बँडला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. सोमवारी अचानक या आयरिश गायिकेचे निधन झाले. डोलोरेसच्या प्रवक्त्याने एका निवेदनाद्वारे निधनाची बातमी खरी असल्याचे स्पष्ट केले. ‘द क्रेनबेरीज’ची मुख्य गायिका एका शॉर्ट रेकॉर्डिंगसाठी लंडनमध्ये गेली होती. अचानक तिच्या मृत्यूची बातमी आली. हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे, असे डोलोरेसच्या प्रवक्त्याने सांगितले. अर्थात तिच्या या अचानक झालेल्या मृत्यूमागचे कारण मात्र प्रवक्त्याने स्पष्ट केले नाही.
मेट्रोपॉलिटन पोलिसांनीही डोलोरेसच्या मृत्यूबाबत माहिती दिली आहे.   लंडनच्या एका हॉटेलात डोलोरेस मृतावस्थेत आढळली. हॉटेलमधील तिचा मृतदेह पाहून हॉटेल मालकाने पोलिसांना पाचारण केले.
डोलोरेसच्या मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘द क्रेनबेरीज’मधील तिचे सहकलाकार नोएल होगन, फर्गल लॉलर आणि माइक होगन यांनी डोलोरेसच्या मृत्यूवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. डोलोरेस एक महान गायिका होता. आम्ही तिच्या आयुष्याचा भाग म्हणून जगलो, ही आमच्यासाठी भाग्याशी गोष्ट आहे, असे तिच्या सहका-यांनी लिहिले आहे. सन १९९३ मध्ये ‘द क्रेनबेरीज’चा पहिला अल्बम ‘एवरीबडी एल्स इज डुइंग इट, सो वाय कांट वी?’ आला. या अल्बमने या बँडला लोकप्रीयतेच्या शिखरावर पोहोचवले. त्यावेळी जगभरात या अल्बमच्या ४ कोटी रेकॉर्ड विकल्या गेल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments