Thursday, March 28, 2024
Homeमनोरंजन‘पद्मावत’च्या यशाच्या जल्लोषापासून शाहिद चार हात लांब?

‘पद्मावत’च्या यशाच्या जल्लोषापासून शाहिद चार हात लांब?

बॉलिवूडसाठी २०१८ या वर्षाची दणक्यात सुरुवात करत प्रदर्शित झालेल्या पद्मावतया चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं. संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाच्या जोडीने दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग या तिघांनीही कलेचा दर्जेदार नमुना प्रेक्षकांसमोर सादर केला. आता कुठे या चित्रपटाचा विरोध मावळून सर्वकाही सुरळीत सुरु असताना या वातावरणात मीठाचा खडा पडल्याचं कळत आहे. चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं आता जवळपास संपूर्ण कलाविश्वाला माहिती झालं आहे.

अगदी कमी वेळातच या चित्रपटाच्या वाट्याला आलेलं यश पाहता सध्या कलाविश्वात अनेकांनाच त्याचा हेवा वाटतोय. प्रेक्षक आणि माध्यमांनी साथ दिल्यामुळेच चित्रपटाच्या ‘सक्सेस पार्टी’चं आयोजन करण्याचा बेत आखला जातोय. ज्यामध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींनाही बोलावलं जाणार आहे. पण, या पार्टीला शाहिद कपूर येणार नसल्याचं वृत्त ‘पिंकविला’ने प्रसिद्ध केलं आहे. रणवीर सिंगला टाळण्यासाठीच त्याने हा निर्णय घेतल्याचं कळत आहे. चित्रपटाच्या सेटवर आपण एकटं पडल्याची प्रतिक्रिया शाहिदने काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतरपासूनच शाहिद आणि रणवीरमध्ये धुमसणाऱ्या वादाच्या ठिणगीची कल्पना अनेकांना आली.

चित्रपटाला मिळालेलं यश साजरा करण्यासाठी शाहिदला रणवीरसोबत माध्यमांसमोर येण्याची इच्छा नाही. लोक लगेचच आपण साकारालेल्या ‘महारावल रतन सिंह’ आणि रणवीरने साकारलेल्या ‘खिल्जी’च्या भूमिकांची तुलना सुरु करतात आणि हेच आपल्याला नको असल्याचं कारण पुढे करत त्याने पार्टीला न येण्याचा निर्णय घेतला आहे. शाहिदच्या या निर्णयामुळे चित्रपटाच्या टीमने अद्यापही ठरलेल्या तारखेला पार्टीचं आयोजन केलं नाही. पण, आता शाहिदशिवाय ‘पद्मावत’ची ‘सक्सेस पार्टी’ होते का, हे पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments