Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनम्हणून अमृता सिंग आणि सैफ अली खानचा झाला होता घटस्फोट

म्हणून अमृता सिंग आणि सैफ अली खानचा झाला होता घटस्फोट

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या घटस्फोटाला आता अनेक वर्षं झाली आहेत. सैफने करिना कपूरसोबत लग्न केले असून ते दोघे त्यांच्या संसारात चांगलेच खूश आहेत. त्यांना तैमूर हा वर्षांचा मुलगा देखील आहे. सैफने अमृतासोबत लग्न केले, त्यावेळी सैफ आणि अमृताच्या लग्नाची चांगलीच चर्चा मीडियात रंगली होती. कारण त्या दोघांमध्ये जवळजवळ १२ वर्षांचे अंतर होते. सैफ अमृताला पाहाताच क्षणी तिच्या प्रेमात पडला होता आणि त्याने काहीच दिवसांत तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांची प्रेमकथा खूपच इंटरेस्टिंग आहे.

बेखुदी या चित्रपटाद्वारे सैफ अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होता. या चित्रपटाच्या निमित्ताने एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला अमृता देखील आली होती. त्या काळात अमृता ही खूप प्रसिद्ध अत्रिनेत्री होती आणि तिच्या सौंदर्याची चांगलीच चर्चा होती. याच पार्टीत सैफ आणि अमृताची केमिस्ट्री जुळून आली आणि पार्टीनंतर सैफने अमृताला डिनरसाठी विचारले. मी डिनरसाठी कुठे जात नाही. पण तू माझ्या घरी येऊ शकतोस असे उत्तर अमृताने दिले. सैफ अमृताच्या घरी पोहोचल्यानंतर दोन दिवस तरी तो तिथेच होता. नंतर तो अमृतासोबतच तिच्या घरी राहू लागला. काहीच दिवसांत त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले आणि त्या दोघांनी लग्न केले.
सैफ आणि अमृताने २००४ मध्ये घटस्फोट घेतला. त्यांनी घटस्फोट का घेतला होता याबाबत त्यांनी मौन पाळणेच पसंत केले होते. पण टेलिग्राफला काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सैफने घटस्फोटाच्या कारणाबाबत सांगितले होते. त्याने या मुलाखतीत अमृताच्या नावाचा उल्लेख न करता म्हटले होते की, तुम्ही बेकार आहेत, काहीही काम करत नाही आहात असे तुम्हाला सतत ऐकवले जाते, त्यावेळी तुमच्या मनाला खूप वाईट वाटते. तसेच तुमच्या आईला-बहिणीला शिव्या दिल्या जातात, हे सगळे ऐकणे अतिशय वाईट असते. मी माझ्या आयुष्यात अनेक वर्षं या गोष्टींचा सामना केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments