Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमनोरंजन…म्हणून सलमानने सुशांतला फटकारले?

…म्हणून सलमानने सुशांतला फटकारले?

यारों का यारम्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान नेहमीच नवोदित कलाकारांना पाठिंबा देतो. पण, वेळ पडल्यास तो या कलाकारांना रागेही भरतो असे म्हणायला हरकत नाही. स्पॉटबॉय ईया वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सलमानने अभिनेता सुशांत सिंग राजपूतला रागे भरले आहे.

सूरज पांचोलीसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याने सुशांतची कानउघडणी केल्याचे म्हटले जातेय. सूरजसोबत सुशांत बेशिस्तपणे वागला असल्याचे कळताच, सलमानने त्याला बोलावून घेतले आणि सूरजपासून चार हात लांब राहण्याचा सल्ला दिला. सरतेशेवटी सलमानची माफी मागण्यावाचून सुशांतकडे कोणताच पर्याय नव्हता. सूरज पांचोलीवर सलमानचा वरदहस्त असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. किंबहुना त्याच्या बॉलिवूड पदार्पणातही ‘भाईजान’नेच हातभार लावला होता. त्यामुळे आपल्या गोटातील कलाकारासोबत कोणी चुकीच्या पद्धतीने वागल्याचे कळताच सलमान लगेच त्याची दखल घेतो.

सलमान खान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या तारा काही केल्या जुळण्याचे नाव घेत नाही. बऱ्याच सेलिब्रिटींसोबत मित्रत्वाचे नाते असणाऱ्या या ‘दबंग खान’चे सुशांतसोबतचे समीकरण फारसे चांगले नाही. त्यामुळे सुशांतविषयी काही प्रश्न विचारल्यासही आपल्याला काहीच माहिती नसल्याचा आव आणत सलमान त्याच्याविषयी बोलणे टाळतो, अशी चर्चा बी-टाऊनमध्ये रंगल्याचे पाहायला मिळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments