Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनरणवीर सिंगने केली ‘या’ अभिनेत्याच्या २३ वर्षांपूर्वीच्या लूकची कॉपी!

रणवीर सिंगने केली ‘या’ अभिनेत्याच्या २३ वर्षांपूर्वीच्या लूकची कॉपी!

रणवीर सिंगचा पद्मावतीरिलीज होवो ना होवो. पण आता रणवीर सिंग सिम्बाबनून येतो आहे. होय, रणवीरचा अपकमिंग चित्रपट सिम्बाचे टीजर पोस्टर अलीकडेच रिलीज झाले. रोहित शेट्टीच्या या चित्रपटातील रणवीरचा लूक पाहून लोक सिम्बाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. याच चित्रपटाबद्दल आम्ही एक खास माहिती आज तुम्हाला देणार आहोत. होय, या चित्रपटातील रणवीरच्या लूकबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रणवीर या चित्रपटात पहिल्यांदा पोलिस कर्मचा-याच्या भूमिकेत आहे. पण रणवीरचा हा लूक एका जुन्या अभिनेत्याच्या लूकची कॉपी आहे, असे आम्ही तुम्हाला सांगितले तर? होय, ‘सिम्बामधील रणवीरच्या लूकची अनिल कपूरच्या लूकशी तुलना केली जात आहे.

‘सिम्बा’मध्ये रणवीरचा लांबलचक मिशी असलेला लूक यापूर्वीही आपण पाहिलाय. १९९४ मध्ये आलेल्या ‘मिस्टर आझाद’ या चित्रपटात अनिल कपूर अशाच लूकमध्ये दिसला होता. यात अनिलही एका पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत होता. ‘मिस्टर आझाद’मधील अनिल आणि ‘सिम्बा’मधील रणवीरचा लूक एकदम मिळताजुळता आहे.
पुढीलवर्षी २८ डिसेंबरला ‘सिम्बा’ रिलीज होणार आहे. म्हणजेच, या चित्रपटाला ख्रिसमससोबतच नव्या वषार्चाही फायदा मिळणार आहे. ‘सिम्बा’ हा चित्रपट साऊथच्या ‘टेम्पर’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ‘टेम्पर’मध्ये ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री काजल अग्रवाल लीड रोलमध्ये होते. ‘सिम्बा’मध्ये ज्युनिअर एनटीआरची जागा रणवीर घेणार आहे. चित्रपटाची हिरोईन मात्र अद्याप फायनल झालेली नाही. सध्या अनेक अभिनेत्रींची नावे या चित्रपटासाठी चर्चेत आहेत.

रणवीरने नुकताच ‘पद्मावती’ हा चित्रपट हातावेगळा केला. यात रणवीर अलाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर प्रथमच निगेटीव्ह रोलमध्ये दिसेल. तूर्तास रणवीरचा हा चित्रपट वादात सापडला आहे. त्यामुळे त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. ‘पद्मावती’नंतर रणवीर लगेच ‘गली ब्वॉय’मध्ये बिझी झाला. या चित्रपटात तो रॅपरची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटासोबतच रणवीर ‘सिम्बा’चे शूटींग सुरु करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments