Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशश्रीदेवी यांना 'मॉम' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार

श्रीदेवी यांना ‘मॉम’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार

sridevi, mom movieनवी दिल्ली – ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना मॉमसिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

तर,  65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सुयश शिंदे दिग्दर्शित ‘मयत’ हा सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला आहे. राजेंद्र जंगलेची ‘चंदेरीनामा’ बेस्ट प्रमोशनल फिल्म म्हणून निवडण्यात आलीय, तर ‘मृत्यूभोग’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. ‘म्होरक्या’ या मराठी चित्रपटाला स्पेशल मेन्शन पुरस्काराचा मान मिळालाय, तर ‘पावसाचा निबंध’ या लघुपटासाठी नागराज मंजुळे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आलेला ‘न्यूटन’ हा सिनेमा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून निवडण्यात आलाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments