Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनमिस्टर परफेक्शनिस्ट’आमिरची इंस्टाग्रामवर जादू!

मिस्टर परफेक्शनिस्ट’आमिरची इंस्टाग्रामवर जादू!

Amir Khan, Bollywood, perfectnist

अभिनेता आमिर खान मिस्टर परफेक्शनिस्ट हा नेहमीच काही तरी वेगळ करण्याच काम करत असतो. चित्रपटांमधील अभिनय असो की सत्यमेव जयते सारखा एखादा कार्यक्रम असो फाउंडेशनच्या माध्यमातून सुरु केलेले काम आमिर ते इतरांपेक्षा वेगळे आणि सर्वोत्तम करतो. होय म्हणूनच तो मिस्टर परफेक्शनिस्ट आहे. त्यात त्याने आणखी एक भर टाकली ती म्हणजे इंस्टाग्रामची. तर चला बघू या काय नवीन काय आहे.

आमिरने इंस्टाग्रामचा अशा पद्धतीने वापर केला आहे जो याआधी कोणीच केला नसेल. इतक नव्हे तर इंस्टाग्राम वापरण्याबद्दलचा नवा विचारच मांडला आहे. आमिरच्या या भन्नाट प्रयोगामुळे त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवे रंग भरले आहेत. आमिरने इंस्टाग्रामवर नऊ फोटोंची एक मालिकाच पोस्ट केली आहे. हे फोटो त्याने एका कोलाजच्या स्वरुपात पोस्ट केले आहेत. हे सर्व वेगवेगळे आहेत पण त्याकडे एकत्र पाहिल्यानंतर एक मोठा फोटो तयार होतो. आमिरच्या इंस्टाग्रामवर गेल्यावर हे नऊ फोटो वेगवेगळे दिसतात. पण जेव्हा त्या सर्वांना एकत्रपणे पाहिले जाते तेव्हा मुळ फोटो दिसतो.

आमिर दोन आठवड्यांपूर्वीच इंस्टाग्रामवर दाखल झाला आहे आणि फोटो शेअरिंग मीडियाचा अतिशय हटके पद्धतीने तो वापर करत आहे. यातील आणखी एक विशेष बाब म्हणजे आमिर जेव्हा त्याच्या इंस्टाग्रामवर नवी पोस्ट टाकतो तेव्हा त्याने पोस्ट केलेले जुनी पोस्ट प्रोफाईलमधून निघून जाते. आमिरच्या इंस्टाग्रामवरील या वापरामुळे अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. आमिरला चित्रपटचे मार्केटिंग कसे करायचे याची चांली जाण आहे. त्याच बरोबर त्याला आता सोशल मीडियात स्वत:कडे कसे आकर्षिक करुन घ्यायचे हेही त्याला चांगलेच समजते. आमिरच्या या भन्नाट कल्पनेवर ‘मान गये मिस्टर परफेक्शनिस्ट’, असेच म्हणावे लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments