Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनआमिरची लहान ‘मुलगी’ सान्या मल्होत्रा देणार गोड बातमी!

आमिरची लहान ‘मुलगी’ सान्या मल्होत्रा देणार गोड बातमी!

‘दंगल’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात आमिर खानच्या लहान मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिचे नशीब सध्या चांगलेच जोरावर आहे. होय, सान्याला एका पाठोपाठ एक अशा चित्रपटाच्या ऑफर्स मिळत आहेत. ‘सीक्रेट सुपरस्टार’ या आमिरच्याच चित्रपटाची कोरिओग्राफी केल्यानंतर  सान्याने ‘फोटोग्राफर’ आणि ‘मनमर्जिया’ हे दोन चित्रपट साईन केलेत. आता तिच्या झोळीत आणखी एक मोठा चित्रपट पडला आहे.

या चित्रपटात अभिनेता आयुष्यमान खुराणा तिचा हिरो आहे. आता या चित्रपटाचे नाव ऐकण्यास तुम्ही आतूर असाल तर चित्रपटाचे नाव आहे, ‘बधाई हो.’ होय, ‘जंगली पिक्चर्स’ने या चित्रपटासाठी सान्याला कास्ट केले आहे. सान्याने ‘दंगल’मध्ये आयुष्यमान खुराणाचा भाऊ अपारशक्तीसोबत काम केले होते. अपारशक्तीने या चित्रपटात सान्याच्या भावाची भूमिका साकारली होती. या महिन्याच्या अखेरिस ‘बधाई हो’चे शूटींग सुरु होणार आहे. सान्या सध्या रितेश बत्रा यांच्या ‘फोटोग्राफर’ या चित्रपटात व्यस्त आहे. यात ती नवाजुद्दीन सिद्दीकी सारख्या सीनिअर अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. मुंबईत या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. हा चित्रपट हातावेगळा करताच सान्या अनुराग कश्यप याच्या ‘मनमर्जियां’मध्ये बिझी होणार आहे.
‘बधाई हो’  हा एक फॅमिली ड्रामा आहे. या कुटुंबाला अचानक एक बातमी मिळते आणि या बातमीने अख्खे कुटुंब तणावात येतात. सगळे जण आपआपल्यापरिने ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू लागतात, अशी या चित्रपटाची कथा आहे. अमित शर्मा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. अमितने जवळपास १ हजारांवर जाहिरातींचे दिग्दर्शन केले आहे. २०१५ मध्ये आलेला अर्जुन कपूर व सोनाक्षी सिन्हाचा ‘तेवर’ हा चित्रपट अमित शर्माने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये डायरेक्शन डेब्यू केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments