Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनअभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा 'या' पुरस्कारानं सन्मान

अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा ‘या’ पुरस्कारानं सन्मान

naseeruddin shah,Tanvir Award,Tanvir Sanman Awardज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना रुपवेध प्रतिष्ठानचा २०१९ चा तन्वीर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रुपवेध प्रतिष्ठानच्या कार्यवाह दिपा लागू यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

सन्मानचिन्ह, मानपत्र आणि १ लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ९ डिसेंबर रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा सोहळा पार पडणार आहे. रुपवेध प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिने सृष्टीतील कलावंताना गेल्या पंधरा वर्षापासून तन्वीर सन्मान आणि नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल तन्वीर नाट्यधर्मी पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.

यंदाचा २०१९ चा तन्वीर सन्मान जेष्ठ अभिनेते ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, तर तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थेला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती दिपा लागू यांनी दिली. या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू, ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी, रत्ना पाठक आदी दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments