अभिनेत्री असिन बनली आई

- Advertisement -

मुंबई : सोहा अली खान, ईशा देओल यांच्यापाठोपाठ आता असिन थोट्टूमकलही आई बनली आहे. ‘गजनी’ सिनेमाची अभिनेत्री असिनने मंगळवारी मुलीला जन्म दिला.

असिनचा पती राहुल शर्माने पहिल्या बाळाच्या आगमनाची गोड बातमी सांगितली. शिवाय शुभेच्छा देणाऱ्यांचे आभारही मानले.

असिनने 19 जानेवारी 2016 रोजी मायक्रोमॅक्सचा संस्थापक राहुल शर्मासोबत लग्न केलं होतं. पहिल्यांदा ख्रिश्चन रिवाजानुसार चर्चमध्ये आणि नंतर हिंदू पद्धतीने त्यांचा विवाह पार पडला.

- Advertisement -

या दाम्पत्याने प्रेग्नंसीविषयी अतिशय गुप्तता बाळगली होती. मंगळवारी त्यांनी एक परिपत्रक काढून नन्ही परी घरात आल्याची गोड बातमी शेअर केली. “आम्हा दोघांसाठी मागचे 9 महिने फारच स्पेशल आणि रोमांचक होते. आमच्यासाठी प्रार्थना करणारे आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार,” असं या परिपत्रकात म्हटलं आहे.

अभिनेत्री असिनने ‘गजनी’ या सिनेमातून 2008 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 100 कोटी क्लबची अभिनेत्री म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. याशिवाय सलमान खानसोबत रेडी सिनेमातही ती झळकली होती. परंतु लग्न झाल्यावर तिने अभिनयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -